Nashik News Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

Swachhata Abhiyan : स्वच्छतेमुळे अनेक गावांचा कायापालट होऊन गावे आदर्श झाली आहेत. स्वच्छता अभियानामुळे देशातील बालमृत्यू कमी झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

Team Agrowon

Nashik News : स्वच्छतेमुळे अनेक गावांचा कायापालट होऊन गावे आदर्श झाली आहेत. स्वच्छता अभियानामुळे देशातील बालमृत्यू कमी झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे सर्व गावांनी गट-तट विसरून राजकारण न करता परदेशातील गावांप्रमाणे स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव तयार करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. ५) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झाला.

या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार भास्कर भगरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.

ॲग्रो विशेष

डॉ. गेडाम यांनी स्वच्छतेच्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन करताना लोकसहभागातून आदर्श गाव तयार करण्याचे आवाहन केले. स्वच्छता अभियानामुळे गावाचा कायापालट होत असून, मी स्वत: सरपंच असताना या अभियानात काम केले आहे. किंबहुना स्वच्छता अभियानाच्या कामामुळेच मी खासदारपदापर्यंत पोहोचल्याचे खासदार भगरे यांनी या वेळी सांगितले.

मित्तल यांनी या वेळी मार्गदर्शन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तसेच स्वच्छता अभियानाबाबत माहिती दिली. या वेळी पुरस्कारप्राप्त बारागाव प्रिंप्रीच्या सरपंच संध्या कटके, दहिंदुले ग्रामपंचायतीच्या अधिकारी डॉ. स्वाती देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

सन्मानित गावे

  • सन २०१८-१९ ः शिरसाणे (चांदवड) प्रथम, लोखंडेवाडी (दिंडोरी) द्वितीय, हनुमाननगर (निफाड) व बोरवट (पेठ) तृतीय विभागून.

  • सन २०१९-२० ः गोंडेगाव (दिंडोरी) प्रथम, शिरसाणे (चांदवड) द्वितीय, शिवडी (निफाड) व नवे निरपूर (बागलाण) तृतीय विभागून. विशेष पुरस्कार ः कोटमगाव (नाशिक), धामणगाव (इगतपुरी) व हनुमाननगर (पेठ).

  • सन २०२०-२१ व २०२१-२२ (एकत्रित स्पर्धा) ः पिंपळगाव बसवंत (निफाड) प्रथम, सुळे (कळवण) व नवे निरपूर (बागलाण) द्वितीय विभागून, शिरसाळे (इगतपुरी) तृतीय. विशेष पुरस्कार ः ओझरखेड (दिंडोरी), खुंटेवाडी (देवळा), पाहुचीबारी (पेठ).

  • सन २०२२-२३ ः दहिंदुले (बागलाण), राजदेरवाडी (चांदवड), माळवाडी (देवळा). विशेष पुरस्कार ः अंदरसूल (येवला), आघार बुद्रुक (मालेगाव), पिंपळगाव बसवंत (निफाड).

  • सन २०२३-२४ ः डाबली (मालेगाव) प्रथम, लाडूद (बागलाण) द्वितीय, उंबरखेड (निफाड) तृतीय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT