Deforestation Agrowon
ॲग्रो विशेष

Deforestation : खानदेश, मराठवाडा सीमेवर जंगल दुर्लक्षित

Khandesh Deforestation : तोंडापूर (ता. जामनेर) परिसराला लागून अजिंठा पर्वत रांगा असून, या भागात वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : परिसराला लागून अजिंठा पर्वत रांगा असून, या भागात वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. वनविभागाने वेळीच लक्ष न घातल्यास या भागातील जंगल बोडके होण्याची भीती निसर्ग प्रेमी व पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.

तोंडापूर हे मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर असून, जळगाव जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या परिसराला जवळ अजिंठा पर्वतरांग आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वृक्षतोड होत असून दररोज दिवसा लाकडाने भरलेले ट्रॅक्टर भरून जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे याकडे वन विभागाने वेळीस लक्ष न दिल्यास जंगल बोडका होण्याची भीती निसर्ग प्रेमी व पर्यावरण प्रेमी वर्गातून व्यक्त होत आहे.

तोंडापूर परिसराला मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असल्याने विदर्भातील काही भागांत व मराठवाडा भागांतील गावात वन विभागाचे कर्मचारी पोहोचत नसल्याने त्या भागातून तोंडापूर गावातील बस स्थानकावरून रविवार सुट्टीचा दिवस व रात्रीच्या वेळी लाकूडतोड व्यापारी लाकडाचे वाहन भरून वाहतूक करत आहे.


पासचा गैरवापर
लाकडाचा वापर वीटभट्ट्यांवर सर्रास करण्यात येत आहे. वन विभागाकडून वाहतूक परवाना न घेता वीटभट्ट्या मालकांच्या नावावर असलेल्या पासेसचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.

कागदोपत्री पास फक्त नावाला असून, त्यावरील परवानगीपेक्षा जास्त वृक्षांची कत्तल करून लाकडाची वाहतूक होत असल्याने जंगल बोडके होऊन अजिंठा डोंगररांगांमधील वन्यप्राणी बिबट्याचा वावर गावशिवारात होत आहे.

गावाच्या लगत असलेल्या केळीच्या बागेत दिवसा बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. तोंडापूर परिसरात होणाऱ्या अवैध वृक्ष तोडीमुळे जंगलातील पशूचा लोकवस्तीच्या दिशेने राबता वाढायला लागला आहे. त्यामुळे अवैध कत्तलीला प्रतिबंध न बसल्यास दिवसा वन्यप्राण्याचा लोकवस्तीत उच्छाद वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT