Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Nafed Procurement : नाफेड प्रथमच करणार बाजार भावाने तूर खरेदी

K. J. Shevale : यंदा प्रथमच शासनाकडून हमीभावाने नव्हे, तर बाजार भावाने तूर खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

Team Agrowon

Parbhani News : नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने किंमत स्थिरीकरण योजना (प्राइस स्टॅबिलायझेशन फंड ः पीएसएफ) अंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघाच्या (स्टेट कॉ-ऑप. मार्केटिंग फेडरेशन) संस्थाकडून तूर खरेदी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात जिंतूर, बोरी, मानवत, पाथरी

या ४ ठिकाणी व हिंगोली जिल्ह्यात बळसोंड, जवळा बाजार, सेनगाव या ३ ठिकाणी मिळून दोन जिल्ह्यांत एकूण ७ केंद्रांना परवानगी मिळाली आहे. यंदा प्रथमच शासनाकडून हमीभावाने नव्हे, तर बाजार भावाने तूर खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

शासनाने आता खरीप कडधान्य हमीभावापेक्षा बाजारभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांना फायदाच होईल. शासनाने यंदा तुरीसाठी (किमान आधारभूत किंमत) हमीभाव ७ हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. मात्र बाजारामध्ये तुरीची ८ हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे.

परभणी जिल्ह्यात ४ व हिंगोली जिल्ह्यात ३ खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल तर त्यांना इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त ऑनलाइन पीकपेरा असलेला ७ /१२ उतारा जोडावा लागणार आहे.

नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड, अचूक बँक खाते आणि ऑनलाइन पीक पेरा असलेला ७/१२ उतारा जोडणे आवश्यक आहे. यावर्षी नाफेड दररोज बाजारभाव सकाळी खरेदी केंद्रांना कळवेल. त्याच दराने तूर खरेदी केली जाईल.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्रे

तालुका संस्था खरेदी केंद्राचे ठिकाण

जिंतूर जिंतूर जिनिंग ॲण्ड प्रेसिंग सह. सोसायटी जिंतूर

जिंतूर तुळजाभवानी कृषी विकास सेवा सहकारी संस्था बोरी

मानवत मानवत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मानवत

पाथरी स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मानवत पाथरी

हिंगोली प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संघ हिंगोली बळसोंड

औंढा नागनाथ औंढा (ना.) तालुका सह. खरेदी-विक्री संघ जवळा बाजार

सेनगाव श्रीसंत भगवानबाबा स्वयंसेवा सह. सं. म. कोथळज सेनगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT