IAS Raghunath Gawde Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : चारा, पाण्याचा काटेकोर वापर करावा लागेल : जिल्हाधिकारी

Collector Raghunath Gawde : पावसाळा येईपर्यंत उपलब्ध चारा व पाण्याचा काटेकोर वापर करावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : गतवर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व महसुली मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून आवश्यक त्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई आहे.

मात्र जूनपर्यंत पुरेल एवढा चारा व पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. पावसाळा येईपर्यंत उपलब्ध चारा व पाण्याचा काटेकोर वापर करावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

महाराष्ट्र स्थापना दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम बुधवारी (ता. १) सकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर पार पडला. या वेळी जिल्हाधिकारी गावडे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर,

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, संगीता चव्हाण, जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे आदी उपस्थित होते.

गावडे म्हणाले, की जिल्ह्यात झालेला अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ४५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तसेच वीज पडून २ नागरिक, तर २९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १ व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला असून त्यांना मदत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये विकासात मोठी भरारी घेत उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. या प्रगतीमध्ये जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, असे आवाहन गावडे यांनी केले. मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी आयोजित रिल्स स्पर्धा, गुढी मतदानाची या स्पर्धेतील विजेते तसेच उत्कृष्ट तलाठी पुरस्कार‌ वितरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT