Chara Chhavani Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : बारामती तालुक्यात चाऱ्याची टंचाई, चारा छावणी मागणी

Drought Condition : बारामती तालुक्यात सध्या विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्यामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्यात सध्या विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्यामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने जिरायती भागात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

तालुक्यातील पळशी, तरडोली, लोणी भापकर, मुर्टी या गावांमधून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी बारामती पंचायत समिती व बारामती तहसील कार्यालय यांच्याकडे केली आहे. जिरायती भागामध्ये ९९ टक्के शेतकऱ्यांकडे पशुधन असून,ते जगवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

विकतचा चारा आणणे परवडणारे नसले तरी चढत्या भावाचा विकतचा चारा आणण्याची वेळ आली आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी चारा पिकाचे उत्पादन घेतले आहे तर बागायती भागातही चारा पिके यांचे उत्पादन घेऊन जिरायती भागांमध्ये तो विक्री करण्याचे सध्या काम सुरू आहे.

सध्या दुधाला २६ रुपये प्रतिलिटर दर आहे एका गाईकडून सरासरी पशुपालकांना वीस ते बावीस लिटर दुधाचे उत्पादन दर दिवसाला मिळते. मात्र, गाई साठी दिला जाणारा पशुखाद्य व दोन वेळेचा चारा यांचा खर्च काढला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहत नसल्याची परिस्थिती आहे, अशी माहिती तरडोली येथील पशुपालक राजेंद्र वाघ, राजेंद्र गाडे, सतीश गाडे ,संभाजी शिरे राहुल गाडे यांनी दिली.

पावसाअभावी ज्वारीही हातातून गेल्यामुळे हक्काचा चारा शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची परिस्थिती आहे. याशिवाय आहे त्या पाण्यावर मका कडवळ नेपियर मेथी घास अशी थोडीफार प्रमाणामध्ये पिके होती. मात्र पाण्याअभावी ही पिके अडचणीत आली आहेत त्यामुळे सध्या चारा छावण्या मधून चारा उपलब्ध व्हावा ही मागणी पशुपालकांमधून जोर धरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT