Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : खानदेशात चाराटंचाई कायम

Khandesh Fodder Update : खानदेशात चाराटंचाई सध्या कायम आहे. खरिपातून हवा तेवढा चारा मिळाला नाही. नाही. अशात चाऱ्याचे दरही गगनास भिडले. चाऱ्याची टंचाई कायम असून, रब्बीतील पिकांची काढणी गतीने सुरू झालेली नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात चाराटंचाई सध्या कायम आहे. खरिपातून हवा तेवढा चारा मिळाला नाही. नाही. अशात चाऱ्याचे दरही गगनास भिडले. चाऱ्याची टंचाई कायम असून, रब्बीतील पिकांची काढणी गतीने सुरू झालेली नाही. यामुळे किमान २१ ते २२ दिवसांनंतर रब्बीतील चारा उपलब्ध होईल.

पुढील २२ ते २५ दिवस चाऱ्याची समस्या कायम राहणार आहे. खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा व दादर ज्वारीची काढणी पुढील आठवड्यात वेग घेईल. यातून बऱ्यापैकी चारा मिळेल. चाराटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल. तसेच संकरित किंवा सुधारित वाणांची ज्वारी, मका आदी पिकांचा चारा मार्चच्या मध्यात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. यानंतर चाराटंचाई बऱ्यापैकी कमी होईल.

खानदेशात सुमारे १३ लाख पशुधन आहे. यात दुधाळ पशुधनाची संख्याही बऱ्यापैकी आहे. यात शेळ्या व अन्य लहान पशुधनाचा समावेश नाही. माळरान उजाड झाले आहे. यामुळे पशुधनास चराईसाठी नेणे शक्य नाही. घरीच त्यांना पुरेसा चारा द्यावा लागत आहे. खानदेशात दर वर्षी किंवा वर्षभरात दोन्ही हंगामातून सुमारे १८ ते १९ लाख टन चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा असते. परंतु खरिपात परतीचा पाऊस नव्हता.

त्यात चारा पिकांची हानी झाली. ज्वारी, मका, उडीद, मुगाची काड आदी चारा उपलब्ध झाला नाही. तूर पीक बरे होते. तुरीची मळणी मागील महिन्यात सुरू झाली. यात यंदा अनेक शेतकरी मोठ्या मळणी यंत्राच्या मदतीने मळणी करीत असल्याने तुरीचा चारा वाया जात आहे. जे शेतकरी पारंपरिक पद्धतीने खळे तयार करून मळणी करीत आहे, त्याच शेतकऱ्यांकडे तुरीचा पाला व चारा उपलब्ध होत आहे. खानदेशात तूर कमी असल्याने तुरीचा चारा हवा तसा नाही.

दूध उत्पादकांनी कोरडा चारा मागील वर्षी रब्बी हंगामातून उपलब्ध करून घेतला होता. कुट्टी, गव्हाची काड आदी साठविले होते. हा चारा आता संपत आला आहे. खरिपातून चारा हवा तसा उपलब्ध न झाल्याने दूध उत्पाकांना मध्य प्रदेश व अन्य भागातून चारा आणावा लागत आहे.

महाग चारा विकत घ्यावा लागतोय

दूध उत्पादकांनी आपापल्या शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करून समस्या काहीशी दूर केली आहे. परंतु आठवड्यातून चार ते पाच वेळेस कोरडा चाराही पशुधनास हवा असतो. रोज तीन-चार वेळेस हिरवा चारा गायी, म्हशींना देणेही दूध उत्पादक टाळतात. यामुळे महाग कोरडा चारा घ्यावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT