Groundnut Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2025 : खरिपासाठी दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करून द्या

Agriculture Department : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

Team Agrowon

Hingoli News : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमधून त्याबाबत माहिती द्यावी, अशी सूचना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ९) आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समितीचे अशासकीय सदस्य संदीप ससे, दयानंद पतंगे, अविनाश मुळे, सुंदरराव पाटील, भास्कर खोडके, सतीश पाचपुते, गोपू पाटील, शशिकला भंवर, शारदा पोपळघट, अश्विनी इंगोले आदी उपस्थित होते.

आष्टीकर म्हणाले, की सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा. सिंचन सुविधांचे बळकटीकरण करावे. वीज जोडणी, रोहित्र दुरुस्ती, वीज उपकेंद्र निर्मिती ही सर्व कामे वेळेत झाली पाहिजेत.

पाणंद रस्त्याच्या कामाच्या तक्रारी आहेत. जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करुन प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा सुरु करावा. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करावीत. गुप्ता म्हणाले, की जिल्ह्यातील वीज, पाणी, आरोग्य यासह विविध यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT