Crop Variety  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop variety : नव्या उत्पादनक्षम वाण वापरावर भर देण्याची गरज

Crop Productivity : उटी येथील विनोद मैंद या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षात निवड पद्धतीने अनेक वाण विकसित करण्यावर भर दिला आहे. आजवर त्यांनी निवड पद्धतीने चार वाणावर काम केले.

Team Agrowon

Yavatmal News : शेती क्षेत्रात उत्पादकता वाढली तरच उत्पन्न वाढणार आहे ही बाब विचारात घेता शेतकऱ्यांनी आपल्यास्तरावर निवड पद्धतीने का होईना नव्या उत्पादनक्षम वाणाच्या वापरावर भर देण्याची गरज असल्याचे मत महागाव तालुका कृषी अधिकारी सुधाकर धुळधुळे यांनी व्यक्‍त केले.

उटी येथील विनोद मैंद या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षात निवड पद्धतीने अनेक वाण विकसित करण्यावर भर दिला आहे. आजवर त्यांनी निवड पद्धतीने चार वाणावर काम केले. या वेळी त्यांनी हरभऱ्याचे नाव वाण निवड पद्धतीने विकसित केले आहे. एनडब्ल्युआरडी-४८ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

मैंद यांनी त्यांच्या साडेपाच एकर क्षेत्रात हे वाण लावले आहे. या वाणाच्या पाहणीनंतर श्री. धुळधुळे बोलत होते. मंडळ कृषी अधिकारी भारत केचे, राजेंद्र फाळके, कृषी सहायक मुकुंद लोणीकर, ग्रामसेवक तिरुपती केंद्रे, यांची या वेळी उपस्थिती होती.

धुळधुळे म्हणाले, की शेतीमालाची उत्पादकता वाढावी याकरीता शेतकरी मैंद हे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांची प्रयोगशीलता अनुकरणीय असल्याचेही त्यांनी सांगितले. हरभरा पिकाची पाहणी करण्याबरोबरच या वेळी अधिकाऱ्यांनी पीक वाढीच्या अनुषंगाने विविध नोंदीही घेतल्या.

...असे आहे लागवड अंतर

हरभरा लागवडीसाठी दोन ओळीत तीन फूट तर दोन झाडांतील अंतर चार इंच ठेवण्यात आले आहे. ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने पेरणी केली. आता हे पीक बहरात असून एका झाडाला ४८ पेक्षा अधिक फांद्या आणि त्यालाही उपफांद्या असल्याचा दावा विनोद मैंद यांनी केला आहे. गेल्या हंगामात या वाणापासून एकरी २२ क्‍विंटलची उत्पादकता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एकरी वीस किलो बियाणे वापर यामध्ये केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: कर्जाचा भस्मासुर झटपट श्रीमंतीचे मृगजळ

Flower Farming : शेतकऱ्यांनो, फुलशेतीतून मिळवा वर्षभर हमखास उत्पन्न; जाधव यांनी मांडले यशाचे गणित!

CM Relief Fund : सामाजिक बांधिलकी! ‘छत्रपती शाहू शिक्षण’ संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २५ लाखांची मदत

Rabi Sowing : पेरणीचा वेग वाढला! रब्बीची तब्बल ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण

Flower Drop Problem: सोलापूर जिल्ह्याती द्राक्ष बागांना फुलगळ अन्‌ कुजीचा फटका!

SCROLL FOR NEXT