Gajanan Kolhe Agrowon
ॲग्रो विशेष

Rose Farming : अन्नद्रव्य व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर भर

Nutrient Management : भायेगाव (ता. जि. नांदेड) येथील गजानन रेशमाजी कोल्हे हे मागील चार ते पाच वर्षांपासून फुलशेती करत आहेत.

कृष्णा जोमेगावकर

Rose Crop Protection Management :

शेतकरी नियोजन

पीक : गुलाब

शेतकरी : गजानन कोल्हे

गाव : भायेगाव, ता. जि. नांदेड

गुलाब लागवड : एक एकर

भायेगाव (ता. जि. नांदेड) येथील गजानन रेशमाजी कोल्हे हे मागील चार ते पाच वर्षांपासून फुलशेती करत आहेत. दरवर्षी लाल रंगाच्या गुलाबाची लागवड करतात. यावर्षी त्यांनी जून-जुलैमध्ये एक एकरांत गुलाब लागवड केली आहे. याशिवाय सात एकरांत ऊस, आठ एकरांत सोयाबीन आणि चार एकरांत उडीद, मूग लागवड आहे.

सध्या गुलाब लागवडीतून फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सणांचे दिवस असल्याने लाल रंगाच्या गुलाब फुलांना बाजारात चांगले दर मिळत आहेत. आगामी काळात दसरा, दिवाळी इत्यादी सणांना असलेली मागणी लक्षात घेता अन्नद्रव्य व्यवस्थापनासह पीक संरक्षणावर भर दिला जाईल.

लागवड नियोजन

गुलाब लागवडीसाठी चांगली कसदार, उत्तम निचरा होणारी जमीन निवडली जाते. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत शेतजमिनीत मिसळून घेतले.

साधारणपणे जून-जुलै महिन्यात आठ बाय चार फूट अंतरावर गुलाब रोपांची लागवड केली. एक एकर लागवडीसाठी सुमारे १००० रोपे लागली.

लागवडीनंतर लगेच रोपांना ह्युमिक ॲसिडची मात्रा दिली.

लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने १०:२६:२६, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया खताची मात्रा दिली. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर देखील केला आहे.

दर महिन्याला ठिबकद्वारे १९:१९:१९ आणि १२:६१:० हे विद्राव्य खत दिले जात आहे.

वातावरणानुसार बुरशीजन्य रोग आणि रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक घटकांची फवारणी घेण्यात आली.

लागवडीनंतर साधारण दोन महिन्यांनी गुलाब फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या तोड्यांमध्ये फूल उत्पादन कमी होते. मात्र नंतर हळूहळू वाढ होत गेली. असा क्रम दर महिन्याला चालू असतो.

लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यांनी फक्त पोटॅश हे खत दिले जाते. त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य दिले जाते.

गजानन कोल्हे, ९१५८५५४४१३

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT