Pravin Gedam Agrowon
ॲग्रो विशेष

Bio-Fertilizer Production : बाजारातील मागणीनुसार जैविक खत उत्पादनावर भर द्या

Pravin Gedam : शेतकऱ्यांची गरज त्यासोबतच बाजारातील मागणीच्या प्रमाणात जैविक खते तयार करावी. अशी ग्वाही कृषी आयुक्‍त प्रवीण गेडाम यांनी दिली.

Team Agrowon

Vardha News : शेतकऱ्यांची गरज त्यासोबतच बाजारातील मागणीच्या प्रमाणात जैविक खते तयार करावी. त्याकरिता क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करावयाचे असल्यास येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करीत निधी उपलब्धतेवर भर दिला जाईल, अशी ग्वाही कृषी आयुक्‍त प्रवीण गेडाम यांनी दिली.

सेलू येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. भेटीमध्ये त्यांनी प्रयागशाळेत तयार करण्यात येणाऱ्या जैविक खते व त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा, कच्चा माल त्यासोबतच जैविक निविष्ठांची बाजारपेठ याविषयी सविस्तर माहिती घेतली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलेश उगवेकर, पद्माकर कोलगे यांनी

त्यांना माहिती दिली. जैविक औषधी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मान्यतेसाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. प्रयोगशाळेच्या भेटीनंतर कृषी आयुक्‍तांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी बाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. धानोली मेघे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमा दरम्यान ई-केवायसीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

साहसी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाशी देखील त्यांनी संवाद साधला. शेतकरी कंपन्यांनी कोणत्या योजनांवर भर दयावा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

सरपंच जयश्री शंकरदरवार यांनी ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात आलेल्या व येत असलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, आत्मा प्रकल्प संचालक नलिनी भोयर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र राऊत यांची या वेळी उपस्थिती होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT