Yavatmal Zilla Parishad Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal Zilla Parishad Budget : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषीवर ‘फोकस’

यवतमाळ जिल्हा परिषद २०२२-२३ चे सुधारित आणि २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादर केले.

Team Agrowon

Yavatmal Zilla Parishad : यवतमाळ जिल्हा परिषद २०२२-२३ चे सुधारित आणि २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादर केले.

आरंभीची शिल्लक दहा कोटी ८६ लाख ४३ लाख, १७ कोटी १६ लाख ६० हजार रुपये उत्पन्न, असे एकूण २८ कोटी तीन लाख तीन हजार रुपयांच्या अर्थसंकल्पावर मोहोर उमटली.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून कृषीवर फोकस देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

मागील वर्षी सुरू केलेल्या शिक्षण विभागातील योजना महादीप, झेप यांना मिळालेला प्रतिसाद आणि यश बघता यंदाही या योजनांना भरीव तरतूद ठेवली आहे.

आरोग्य विभागात केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

कृषी विभागात सोलवर आधारित योजना सुरू करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ घेता येईल, असे नियोजन करण्यात आले.

तसेच कृषी विभागाला यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा एक कोटी २८ लाख रुपयांची तरतूद अधिक देऊन कृषीला चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाद्वारे पशुपालकांना उत्तम वैरण प्राप्त होण्यासाठी बियाणे संच देण्यासाठी तरतूद आहे.

समाजकल्याण विभागाद्वारे इतर रोजगार निर्मितीच्या तसेच थेट लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या योजनांसोबत यावर्षी व्यसनमुक्ती कार्यक्रमदेखील राबविण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याणमध्ये रोजगार निर्मितीवर भर देवून ई-रिक्षा सांरख्या योजना राबविण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा परिषदेचे संपूर्ण विभाग ई-ऑफिससारखे कार्यक्रम राबवून प्रशासन गतिमान तसेच पारदर्शक करण्यात येणार आहे.

२०२२-२३मध्ये जिल्हा परिषदेला प्राप्त निधीचे शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी स्पर्धात्मक दराने गुंतवणूक केल्याने जिल्हा परिषद सेसच्या व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा सीईओ डॉ. पांचाळ यांनी केला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ज्योती भोंडे यांच्यासह सर्वच विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

या अर्थसंकल्पात दिव्यांग, महिला, मागासवर्गीय लाभार्थी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाकरिता योजना राबवून सर्वसमावेशक असा २०२३-२४चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. लाभार्थ्यांची निवड करताना व लाभ देताना त्यांची हेळसांड होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रशासक तथा सीईओ, जि. प. यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT