Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain : पूर्व विदर्भात पूरस्थिती कायम

Vidarbha Rain Update : अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; पावसाचा कायम

Team Agrowon

Nagpur Rain : पूर्व विदर्भात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद होते.

पूरस्थिती असलेल्या भागात आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता पाहता प्रशासनाकडून आरोग्य शिबिरांचे आयोजन गावोगावी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसात सातत्य असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडाली आहे.

गोंदिया, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही भागांत जोर कायम असला तरी संततधार असल्यामुळे हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरत असल्याचे चित्र आहे.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे. खुनी नदीच्या पातळीतही वाढ झाल्याने मांडवी ते पाटणबोरी रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

यवतमाळमधील आठ तालुक्‍यांतील तब्बल २५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भंडारा जिल्ह्याशी सीमा असलेल्या मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार सुरू आहे. भंडाऱ्यातील अनेक प्रकल्पांचे पाणलोट त्या भागात आहे त्यासोबतच तेथील काही प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. दरम्यान, प्रशासनाने खबरदारीच्या उपाया अंतर्गत गर्भवती महिलांची यादी तयार करून त्यांना गरजेच्यावेळी तत्काळ आरोग्यसेवा मिळावी याकरिता उपाययोजनांवर भर दिला आहे. यातील काही महिला या परराज्यांतील असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील काही महिलांनी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये नोंदणी केली आहे.

चोवीस तासांतील जिल्हानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
अकोला ः ३७
अमरावती ः ५५
चंद्रपूर ः ९१.६
गडचिरोली ः ३०.६
गोंदिया ः ७९.८
वर्धा ः १४.६
यवतमाळ ः ५६.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT