Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Tondapur Dam Water Stock : तोंडापूर धरणाच्या साठ्यात पाच टक्क्यांनी वाढ

Water Storage Update : गावासह अजिंठा लेणीला पाणीपुरवठा करणाऱ्या तोंडापूर मध्यम प्रकल्पात सतत पाच दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार अवकाळी पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Jamnear Irrigation News : गावासह अजिंठा लेणीला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या तोंडापूर मध्यम प्रकल्पात सतत पाच दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार अवकाळी पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्पात आजरोजी ४५ टक्के साठा झाला आहे.

तोंडापूर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून चक्रीवादळ गाराच्या मारासह जोरदार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

जोरदार हवा व गाराच्या माराने कांदा केळी व काही प्रमाणात मक्याच्या पिकाचे तर घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सतत पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतातील कामाला ब्रेक लागला आहे. मात्र अजिंठा डोंगररांगांमधील नद्यांच्या पुराच्या पाण्याने भर उन्हाळ्यात धरणाची पातळी ४० टक्क्यांवरून ४५ टक्के झाली आहे.

धरणाची पाणी पातळी वाढ झाल्याने व परिसरातील नदी नाल्यात पाणी साचल्याने विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. जमिनीत थंडावा निर्माण झाला आहे.

पातळीत वाढ झाल्याने मे महिन्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. याच मध्यम प्रकल्पातून अजिंठा लेणी, फर्दापूर, वाकडी व तोंडापूरला पाणीपुरवठा केला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT