Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death : शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे मंजूर, १३ प्रकरणांना अपात्र ठरवले

Agriculture Issue : शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या २० प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी निकषात न बसणाऱ्या १३ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले.

Team Agrowon

Akola News : शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या २० प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी निकषात न बसणाऱ्या १३ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तर दोन प्रकरणांची फेरचौकशी होणार आहे. यावेळी पाच प्रकरणांच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सततची नापिकी, सावकार किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत देण्यात येते.

संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक मंगळवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत एकूण २० प्रकरणे ठेवण्यात आली.

त्यापैकी पाच प्रकरणे मदतीसाठी पात्र करण्यात आले, तेरा अपात्र ठरले तर दोन प्रकरणांची फेरचौकशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

अशी आहेत पात्र प्रकरणे

सुभाष सोनटक्के (वय ५७, रा. वाडेगाव, ता. बाळापूर), अमर दहिभात (वय २९, रा. बळेगाव, ता. अकोट), संदीप गोपनारायण (वय ४९, रा. घुसर, ता. अकोला), सुधाकर गवारगुरू (वय ४२, रा. सागद, ता. बाळापूर), शिवदास ताथोड (वय ४४, रा. कसुरा, ता. बाळापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT