Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement Center : ‘सीसीआय’मार्फत जिल्ह्यात पाच कापूस खरेदी केंद्रे सुरू

Cotton Market : नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण पाच ठिकाणीच कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा अशा एकूण पाच ठिकाणीच कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय.) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू आहे.

जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. खासगी बाजारात कपाशीचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीविना घरात पडून आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील वर्षी आठ हजार ते दहा हजारावर भाव गेलेला कापूस यंदा मात्र सहा हजार ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. दरवाढीच्या आशेने विक्रीविना साठवून ठेवलेला कापूस शेतकरी विक्रीसाठी पर्याय शोधत आहेत.

यामुळे शासनाने हमीदराने कापसाची खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात सीसीआयने सहा ठिकाणी कपाशी खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या सीसीआय मार्फत नांदेड जिल्ह्यात भोकर येथील केंद्रावर किमान हमीदराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू आहे.

कापूस पणन महासंघाच्या नांदेड विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजीकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या प्रभारी विभागीय व्यवस्थापकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

Water Withdrawal Ban: चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदी

Farm Roads: पेगरगव्हाण शिवारातील ३० वर्षांपासून बंद शेतरस्ते झाले खुले

Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प

LPG Cylinder Booking: सिलिंडर संपण्याची भीती, बुकिंग ८८ लाखांवर, गॅस टंचाईवर केंद्रानं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT