Fisheries  Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Farming : मत्स्यव्यवसायाला मिळणार कृषीचा दर्जा

Fisheries : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासून मच्छीमारांची मागणी लवकरच सत्‍यात उतरणार आहे.

Team Agrowon

Raigad News : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा, ही अनेक वर्षांपासून मच्छीमारांची मागणी लवकरच सत्‍यात उतरणार आहे. शेततळी, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीची निर्मिती करून शेतकरी उत्‍पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात; मात्र उधाण, महापूरामुळे त्‍यांचे मोठे नुकसान होते.

त्‍यांना कृषी क्षेत्राप्रमाणे कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा, याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

हरितक्रांती, सफेद क्रांतीनंतर काही वर्षांपासून सरकारी योजनांचा आधार घेत कोकणात नीलक्रांती आकार घेत आहे. मात्र मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा न मिळाल्‍याने लहान व्यावसायिकांना सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येतात. शीतगृह, वातानुकूलित वाहन खरेदीकडे मच्छीमार लक्ष देत नसल्‍याने मत्स्यव्यवसाय विभागालाही योजना राबवताना अडचणी येत आहेत.

शेततळे उभारण्यावर भर

सरकारी आकडेवारीनुसार, जिल्‍ह्यात साधारण दोन हजार ५०० गोड्या पाण्यातील तळे आहेत, सरकारी अनुदानाची प्रतीक्षा न पाहता शेततळे करणाऱ्यांचीही संख्या दहा हजारांहून जास्त आहे.

प्रदूषणकारी कारखान्यांना बंदी

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक धोरणात बदल करून २०१० पासून प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यांना मनाई करण्यात आली. जे रासायनिक कारखाने अस्‍तित्वात आहेत, त्यांना सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्लांट उभारणीची सक्ती करण्यात आली. या कारखान्यांना शुद्धीकरणानंतरच कारखान्यातील सांडपाणी नद्या, समुद्रात सोडता येते. यामुळे पाताळगंगा, कुंडलिका, सावित्री नदीतील मत्स्यसंपदेचे जतन करण्यास सहकार्य झाले.

मासेमारी बंदरांचा विकास

रायगड जिल्ह्यात करंजा आणि बोडणी, जीवनाबंदर येथे मासे उतरवण्यासाठी खास बंदरांचा विकास केला जात आहे. जिल्ह्यात मासे उतरवणे आणि त्याची साठवणूक करण्यासाठी अद्यापही पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना मुंबईतील ससून डॉक येथे जावे लागायचे. तेथूनच माशांचा लिलाव करीत. अलीकडेच स्थानिक मच्छीमार सोसायट्या, स्थानिक व्यापारी यांच्या पुढाकारातून प्रमुख बंदरांमध्ये लिलाव केंद्र सुरू झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT