Sangli News : शिराळा व वाळवा तालुक्यातील लोकांच्या मागणीनुसार शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वाकुर्डे योजना सुरु केली आहे. वाकुर्डे येथील करमजाई तलावातून पाणी मानकरवाडी येथील बंदिस्त पाईप लाईनच्यामाध्यमातून सोडण्यात आले आहे. हे पाणी शिवपुरी, सुरूल, कापरी कार्वे, ढगेवाडी येथे सोडण्यात येणार आहे. वाकुर्डेचे पहिले आवर्तन सुरू झाल्याने पाणीटंचाई असणाऱ्या परिसरातील पाण्याचा व शेतीचा प्रश्न सध्या सुटणार आहे.
शिराळा तालुक्यात या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाझर तलाव, विहिरी, धरणे यांच्या पाणीसाठ्यात लवकर घट झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विहिरी, कुपनलिका, पाझर तलाव यांची पाणीपातळी गेले अनेक वर्षाच्या तुलनेत दोन महिने अधीच खालावली आहे. त्यामुळे यावर्षी दोन महिने आधीच पाणीटंचाईच्या झाळा सोसाव्या लागत आहे.
यावर्षी शिराळा उत्तर भाग व वाळवा तालुक्यातील लोकांनी डिसेंबर मध्येच वाकुर्डे योजनेच्या पाण्याची मागणी केली होती. मात्र वाकुर्डे बुद्रुक ते मानकरवाडी दरम्यान असलेल्या ८ किलोमीटर कालव्यास गळीत लागली आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तर त्यामुळे या परिसरात असणाऱ्या पिकांचे नुकसान होईल व ऊस तोडणीची कामे थांबतील म्हणून हे पाणी सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला होता.
त्यामुळे डिसेंबर, जानेवारी महिन्यात वाकुर्डे योजनेचे पाणी सोडणे शक्य झाले नाही. मात्र जानेवारी अखेरीस शिराळा उत्तर भागातील अनेक पाझर तलाव व विहिरीच्या पाण्याने तळ गाठला. त्यामुळे बेलदारवाडीसह इतर गावांना पाण्यासाठी भटकंती सुरू झाली.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार भटवाडी, बेलदारवाडीसह इतर जिल्हा परिषदेच्या तलावात लोकांच्या मागणीनुसार पाणी सोडण्याचे नियोजन आहे.डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग, इस्लामपूर
विना परवानगी बंदिस्त नलिकेवरील कोणताही हॉल शेतकऱ्यांनी उघडून नये. असे मध्येच हॉल उघडल्यास पुढे पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण होतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.प्रकाश बंडगर, उपअभियंता
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.