Cotton Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Processing : शेतकरी कंपनीने उभारला राज्यातील पहिला कापूस प्रक्रिया उद्योग

Cotton Market : कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र असलेल्या विदर्भातच प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. ही उणीव दूर करीत शेतकरी कंपनीचा राज्यातील पहिला कापूस जिनिंग प्रकल्प वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून उभारण्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur News : कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र असलेल्या विदर्भातच प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. ही उणीव दूर करीत शेतकरी कंपनीचा राज्यातील पहिला कापूस जिनिंग प्रकल्प वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीकडून उभारण्यात आला आहे. तब्बल १४ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, येत्या हंगामासून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट कापसाची खरेदी केली जाणार आहे.

राज्यात ३८ ते ३९ लाख आणि एकट्या विदर्भात सुमारे १८ लाख हेक्‍टर कापसाची लागवड होते. परंतु प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने हंगामात अपेक्षित दर कापूस उत्पादकांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेता वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने कापसावर प्रक्रिया करीत गाठी बांधण्याचा हायटेक प्रकल्प उभारला आहे.

कंपनीचे संचालक बालाजी ढोबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१७ रोजी स्थापन या कंपनीचे २०२६ भागधारक व ३६ लाख रुपये भागभांडवल आहेत. संचालकांमध्ये नितीन टोंगे, बळीराम डोंगरकर, यशवंत सायरे, आशा सायरे, कृपाली पंचभाई यांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढता आहे, त्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कंपनी म्हणून जबाबदारी ओळखत कापूस गाठी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे ठरले. स्मार्ट प्रकल्पातून याकरिता २ कोटी ४० लाख रुपये अनुदान मिळाले आहे.

चिनोरा शिवारातील हा प्रकल्प ९.६ एकरांवर असून, १४ कोटी रुपयांचे बांधकाम करण्यात आले आहे. यातील जिनिंग युनिटची किंमत अडीच कोटी, तर इतर संयंत्राची किंमत एक कोटी आहे.

धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग करण्याची यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे, याची किंमत तीन कोटी रुपये आहे. याप्रमाणे सुमारे पाच कोटी रुपयांचे सयंत्र या ठिकाणी आहेत. राज्यातील पहिले जिनिंग उभारण्यात आले.

२४ रेचे (डीआर) अशी क्षमता शेतकरी कंपनीच्या या जिनिंगची आहे. संपूर्ण स्वयंचलित प्रणालीचा वापर करण्यात आला असून कन्व्हेंअर बेल्टने कापूस उचलला जातो. त्यानंतर ऑटोमॅटिक फीडिंग होते. २०० गाठी प्रति १४ तास (शिफ्ट) अशी आहे. येत्या दहा दिवसांतच शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जाणार आहे. शेतकरी कंपनीचा कापसावर प्रक्रिया करणारा हा एकमेव आणि पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे व्यापक शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाईल.
- बालाजी ढोबे, संचालक, कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वरोरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT