Natural Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘नॅचरल’कडून उसाची पहिली उचल, अंतिम दर अव्वल राहील

Sugarcane Season : ‘नॅचरल उद्योग’ या वर्षी उसाची पहिली उचल आणि अंतिम भाव देण्यात मराठवाड्यात अव्वल राहील.

Team Agrowon

Dharashiv News : ‘नॅचरल उद्योग’ या वर्षी उसाची पहिली उचल आणि अंतिम भाव देण्यात मराठवाड्यात अव्वल राहील. या वर्षीच्या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

नॅचरल उद्योग समूहाच्या २२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच (ता. २४) गातेगाव येथील राधाकृष्ण आश्रमाचे महंत विद्यानंदजी सागर महाराज आणि ऊस उत्पादक शेतकरी श्री. राकेश व सौ. नूतन माकोडे या दांपत्याच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्‍वरराव काळदाते, प्रभावती गोरे, पांडुरंग आवाड, राजपाल माने, अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, संभाजीराव रेड्डी, किशोर डाळे, प्रवर्तक विष्णू मोहिते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष श्री. ठोंबरे म्हणाले, ‘‘नॅचरल उद्योग समूहाच्या साखर कारखान्याची या वर्षी गाळपक्षमता वाढवून प्रति दिन ७५०० मेट्रिक टन करण्यात आली असून, प्रतिदिन आठ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल.

मार्च २०२४ अखेर सभासद आणि बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण करण्यात येईल. या हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, कारखाना पाच कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करणार आहे.’’

महंत विद्यानंदजी सागर महाराज म्हणाले, ‘‘बी. बी. ठोंबरे म्हणजे महान कर्मयोगी आणि ध्येय्यवेडे व्यक्तिमत्त्व. आपल्या सिद्धांतामध्ये समझोता न करणारा आणि दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पाडणारा उद्योजक होय.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT