Sitaphal Orchard Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Loss: खानवडीतील आगीत सीताफळाची झाडे भस्मसात

Sitaphal Orchard Fire Damage: माळरानावरील गवत जाळताना खानवडी (ता. पुरंदर) येथील लागलेल्या आगीत शेतकरी सुनील धिवार यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवादा कंपनीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प येथे उभा राहत असून त्या क्षेत्रादरम्यानचे गवत जाळले जात असताना ती आग फैलावली.

गणेश कोरे

Purandar News: माळरानावरील गवत जाळताना खानवडी (ता. पुरंदर) येथील लागलेल्या आगीत शेतकरी सुनील धिवार यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवादा कंपनीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प येथे उभा राहत असून त्या क्षेत्रादरम्यानचे गवत जाळले जात असताना ती आग फैलावली.

धिवार यांच्या गट नंबर ५०७ मधील सहा वर्षे वयाची सीताफळांची अनेक झाडे जळाली आहेत. त्याबरोबरच ठिबक सिंचनाच्या पाइपचेही मोठे नुकसान झाले असून प्लॅस्टिकच्या नवीन बारा कूपनलिका आगीत जळाल्या आहेत. आता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने ते हवालदिल झाले आहेत.

सहा वर्षे पाणीटंचाईवर मात करत मेहनतीने राखलेली फळबाग उत्पन्न मिळण्यापूर्वीच नष्ट झाली. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी सुनील धिवार यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे केली आहे.

दरम्यान तलाठी पी. एम. जोजारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. फळझाडांचे आगीत नुकसान झाल्याच्या घटनेस दुजोरा दिला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळेच मोठी हानी झाली असून येथे सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामातही दक्षता घेतली जात नसल्याची तक्रार या वेळी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT