Ginger Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Seed : आले बियाण्यासाठी निरोगी प्लॉटचा शोध

Ginger Cultivation : गेल्या दोन वर्षांपासून आले पिकांचे दर समाधानकारक असल्याने आले लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

विकास जाधव 

Satara News : गेल्या दोन वर्षांपासून आले पिकांचे दर समाधानकारक असल्याने आले लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मार्चमध्ये बियाणे खरेदी सुरू होत असल्याने नवीन आले लागवड करण्यासाठी बियाण्याच्या निरोगी प्लॉटचा शेतकऱ्यांकडून शोध सुरू आहे. बियाण्याचा दर गतवर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजे ३८ ते ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. एकूणच पाण्याच्या स्थितीवर लागवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात आले पीक घेणारा सातारा हा प्रमुख जिल्हा असून सरासरी तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावर आले पिकांची लागवड होते. याही हंगामात सरासरी क्षेत्रा इतकी लागवड होण्याचा अंदाज असला तरी पाण्याच्या स्थितीनुसार क्षेत्र निश्चित होणार आहे. सध्या निरोगी व दर्जेदार बियाण्याचा शोध सुरू झाला आहे.

अनेक प्रगतिशील शेतकरी वेगवेगळ्या प्लॉटची निरिक्षणे करतात. सातारा व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून बियाण्याची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते. या दोन जिल्ह्यातील शेतकरी जुलै, ऑगस्टमध्ये आल्याच्या प्लॉटला भेटी दिल्या जातात. ग्रोधा, बंगळूरमधूनही बियाणे घेतले जाते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून बियाणे खरेदीस वेग येणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत.

सध्या धुणीच्या आले पिकांचे दर टिकून आहेत. या आल्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ३५ ते ३६ हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे बियाण्याचा दर ३८ ते ४० हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञ शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. हा दर गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. गतवर्षी हा दर प्रतिगाडीस सरासरी २५ ते ३० हजार रुपये तर अगदी अंतिम टप्प्यात ३५ हजार रुपयांपर्यंत गेला होता.

कंदकुजीचा प्रादुर्भाव

गत हंगामात अपुरा पावसाचा फटका आले पिकास बसला. कमी पावसामुळे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने कंदकुजीची क्षेत्रात वाढ झाली. ही कंदकुज आटोक्यात न आल्याने अनेक शेतकऱ्यांना आले काढून टाकावे लागले. निरोगी प्लॉट संख्या देखील कमी असल्याने बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांकडून पाहणी करूनच बियाणे खरेदी होणार आहे.

आले हंगाम दुष्टीक्षेपात

- गतवर्षी बियाणे जास्त दराने खरेदी केल्याने भांडवली खर्चात वाढ

- कमी पर्जन्यमानाने हुमणी प्रादुर्भावात वाढ

- कंदकुजीमुळे शेतकऱ्यांना आले मध्यावर काढावे लागले

- वर्षभर पिकास गाडीला ३० हजारावर दर

- बियाण्याचे दर ३८ ते ४० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT