Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : गुणनियंत्रण विभागातून अखेर जाधव यांची बदली

Kiran Jadhav : कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातून किरण जाधव यांची अखेर बदली झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Commissionerate of Agriculture : कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातून किरण जाधव यांची अखेर बदली झाली आहे. बदली आताच न करता पदोन्नतीनंतर करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु, शासनाने या पदावर रामचंद्र धायगुडे यांची नियुक्ती केली आहे.

कृषी आयुक्तालयातील महत्त्वाच्या पदांमध्ये खते विभागाच्या तंत्र अधिकाऱ्याचा समावेश होतो. खत नियंत्रण आदेश १९८५ मधील अधिकारानुसार विशिष्ट परवान्यांचे कामकाज राज्याच्या गुणनियंत्रण विभागाकडून हाताळले जाते. यात तंत्र अधिकाऱ्याला परवानाविषयक कागदपत्रे हाताळण्याचे अधिकार आहेत.

राज्यस्तरीय परवान्यांचे वाटप करणे, स्थगिती देणे किंवा रद्द करण्याची प्रकरणे आधी तंत्र अधिकाऱ्याच्या कक्षातून हाताळली जातात व त्यानंतरच संचालकांकडे पाठवली जातात. त्यामुळे हे पद आपोआप महत्त्वाचे मानले जाते.

बदली होताच या पदाची सूत्रे श्री.धायगुडे यांच्याकडे तत्काळ सोपवून श्री.जाधव यांनी कृषी आयुक्तालयातील मृद्संधारण विभागाशी संबंधित कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्याच्या कृषी दक्षता विभागाचे प्रमुखपद व उपसंचालकपद प्राप्त करण्यासाठी आता चढाओढ सुरू झाल्याची चर्चा आहे.

दक्षता विभाग प्रमुखपद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. या विभागाचा कारभार तात्पुरता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रेणीतील उदय देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे.

फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प संचालक म्हणून मूळ काम सांभाळून श्री. देशमुख गेल्या काही महिन्यांपासून कृषी आयुक्तालयाच्या संगणक प्रकल्पाचे प्रमुखपददेखील यशस्वीपणे सांभाळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT