Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis Management : अखेर १८.२२ कोटींचा टंचाई आराखडा सादर

Rural Water Supply Department : नोव्हेंबर संपत आला असतानाही जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार नसल्याची बाब ‘सकाळ-ॲग्रोवन’ने निदर्शनास आणल्यावर अखेर मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १८.२२ कोटींचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला.

Team Agrowon

Nashik News : नोव्हेंबर संपत आला असतानाही जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार नसल्याची बाब ‘सकाळ-ॲग्रोवन’ने निदर्शनास आणल्यावर अखेर मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १८.२२ कोटींचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आराखड्यात तब्बल १० कोटींनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेने आराखडा सादर केल्यावर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला होता. धरणे ओव्हरफ्लो होती, त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी असल्याने टंचाईच्या झळा लागल्या नाहीत.

मात्र, मार्च ते जून २०२३ या टप्प्यात टंचाई मोठी जाणवली. या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील टँकरची संख्याही १७० वर पोहोचली होती. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने टंचाईच्या झळा ऑगस्ट सप्टेंबरपासून जाणवू लागल्याने ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

साधारणपणे १५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकानिहाय आराखडे मागविले होते. मात्र, तालुकास्तरावरून आराखडा प्राप्त होत नसल्याने टंचाई कृती आराखडा रखडला होता.

याबाबत ‘सकाळ-ॲग्रोवन’ने टंचाई आराखडा रखडला असल्याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी तातडीने लक्ष घालत, बैठक घेत तालुक्यांचे आराखडे मागवून घेत १८.२२ कोटींचा टंचाई कृती आराखडा अंतिम केला.

आराखड्यात ७८७ गावे आणि एक हजार ३७५ वाड्या अशा दोन हजार १६२ गाव-वाड्यांसाठी ३५४ टँकरची आवश्यकता भासणार आहे. यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटी खर्च अपेक्षित आहे. विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या नळ योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

आराखड्यातील उपाययोजना (अपेक्षित खर्च)

उपाययोजना अपेक्षित खर्च

प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे --

विंधन विहीर घेणे १ कोटी ३३ लाख

ना. पा. पु. योजना विशेष दुरुस्त्या ३५ लाख

तात्पुरत्या न. पा. योजना घेणे ७ लाख

विहिरी खोल करणे ३५ लाख

खासगी विहिरी अधिग्रहण करणे २ कोटी ६५ लाख

टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे १३ कोटी ४६ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT