Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : हंगामाचे अंतिम टप्प्यातील नियोजन

Cashew Production : करूळ (ता. वैभववाडी) येथे राऊ पांडुरंग पाटील यांची १५ एकर जमीन आहे. यातील साडेचार एकरामध्ये त्यांनी काजू लागवड केली आहे.

एकनाथ पवार

Cashew Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : राऊ पांडुरंग पाटील

गाव : करूळ, ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती : १५ एकर

काजू लागवड : ४.५ एकर

एकूण झाडे : ४८०

करूळ (ता. वैभववाडी) येथे राऊ पांडुरंग पाटील यांची १५ एकर जमीन आहे. यातील साडेचार एकरामध्ये त्यांनी काजू लागवड केली आहे. त्यात वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातींची सुमारे ४८० झाडे आहेत. याशिवाय १ एकरांमध्ये आंबा लागवड केलेली आहे. संपूर्ण काजू लागवड ही डोंगराळ भागांत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य होत नाही. असे राऊ पाटील सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी

हंगाम संपल्यानंतर साधारण १५ मे नंतर काजू बागेतील झाडाखाली पडलेला सर्व पालापाचोळा एकत्र करून तो झाडाच्या बुंध्यावर रचून ठेवला जातो. याचा दुहेरी फायदा होतो. पालापाचोळ्याखाली असलेले शिल्लक बी जमा करता येते आणि बुंध्यावर रचलेला पालापाचोळा पावसाळ्यात कुजून त्याचा झाडांना फायदा होतो.

जून महिन्यात प्रति झाड सात ते आठ किलो शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. झाडाभोवती चर काढून खतांच्या मात्रा दिल्या जातात. त्यावर झाडाच्या बुंध्यात आणि गोळा केलेला पालापाचोळा घातला जातो.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भातपिकांसह विविध कामे सुरू होतात. याशिवाय पावसाचे प्रमाणही जास्त असते. अशावेळी बागेत कोणतीही कामे करणे शक्य होत नाही.

सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर बागेतील कामकाजास सुरवात केली जाते. बागेत वाढलेली झाडेझुडपे तोडून बागेची स्वच्छता केली जाते.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बागेतील गवत ग्रासकटरच्या मदतीने कापले जाते. यावर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. त्यामुळे काजू बागेत नियोजनानुसार कामे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे किरकोळ प्रमाणात पुन्हा तणांचा प्रादुर्भाव दिसून आला. नोव्हेंबर अखेरीला ग्रासकटरने तण कापण्यात आले.

दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्यास सुरवात होते. मात्र या हंगामात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पालवी येण्यास सुरवात झाली.

यावर्षी नोव्हेंबर अखेरीपासून मोहोर फुटण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत मोहोर येण्याची प्रकिया सुरू होती. दोन ते तीन टप्प्यात यावर्षी झाडांना मोहोर आला. लागवड डोंगराळ भागांत असल्याने तेथे कोणत्याही फवारणीची कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे कीटकनाशकांची कोणतीही फवारणी घेतली जात नाही.

फेब्रुवारी महिन्यापासून पहिल्या टप्प्यातील काजू बी परिपक्व होण्यास सुरवात झाली. सुरवातीला अत्यंत कमी प्रमाणात काजू बी उत्पादन मिळाले. त्यानंतर मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने काजू बी परिपक्व झाले. सध्या काजू बोंडापासून बी वेगळे करण्याचे काम सुरू आहे. काजू बी एकत्रित करून स्वच्छ करून ठेवण्याचे काम केले जात आहे. झाडावरून पडलेले काजू बी बोंडापासून वेगळे करून ते सुरक्षित ठेवण्यावर भर दिला जातो.

आगामी नियोजन

यावर्षीचा काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला असून ७५ टक्के काजू हंगाम आटोपत आला आहे.

सध्या झाडावरून पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पुढील पंधरा ते वीस दिवस काजू हंगाम सुरू राहील. त्यानंतर दोन ते तीन टक्के शिल्लक राहिलेले काजू बी चे उत्पादन अगदी मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.

राऊ पाटील, ८७६६५२६७०१

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT