Soybean Crop Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Crop Productivity : खरीप पिकांची अंतिम उत्पादकता अद्याप प्रलंबित

Kharif Season 2024 : छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतिम उत्पादकता येणे अजून बाकी आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार खरीप ज्वारीचे उत्पादकता हेक्टरी ११ क्विंटल ७१ किलो, तर मका हेक्टरी ३२ क्विंटल २० किलो ९९४ ग्रॅम इतकी आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतिम उत्पादकता येणे अजून बाकी आहे. काही पिकांच्या पीक कापणी प्रयोगानुसार प्राप्त उत्पादकता यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे दिसते आहे.

आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरीप ज्वारीच्या ९० टक्के पीक काढणीअंती दाखल पीक कापणी प्रयोगानुसार जिल्ह्यातील खरीप ज्वारीचे उत्पादकता हेक्टरी ११ क्विंटल ७१ किलो आली आहे. बाजरीची ९५ टक्के काढणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त उत्पादकतेनुसार हेक्टरी उत्पादकता ११ क्विंटल ३६ किलो ५६७ ग्रॅम इतकी आली आहे.

मकाच्या ९० टक्के पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार मकाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ३२ क्विंटल २० किलो ९९४ ग्रॅम इतकी आली आहे. मुगाची ८४ टक्के पीक काढणे झाल्यानंतर प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी उत्पादकता ५ क्विंटल १३ किलो ८७ ग्रॅम इतकी आली आहे. काढणी पूर्ण झालेल्या उडदाची पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादकता हेक्टरी ६ क्विंटल ९१ किलो २४३ ग्रॅम इतकी आली आहे.

जालना जिल्ह्यात खरीप ज्वारीची काढणी पूर्ण झाली असली तरी उत्पादकता येणे बाकी आहे. या जिल्ह्यातील बाजरी पिकाच्या २०४ पीक कापणी प्रयोगापैकी ९० पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादकता हेक्टरी ९ क्विंटल १३ किलो २८ ग्रॅम इतकी आली आहे. मका पिकाच्या १९२ पीक कापणी प्रयोगापैकी ५४ प्राप्त प्रयोगानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता २६ क्विंटल ६४ किलो ३३ ग्रॅम इतकी आली आहे.

मुगाच्या ४०८ पीक कापणी प्रयोगापैकी ३९० पीक कापणी प्रयोगाच्या प्राप्त अहवालानुसार मुगाचे सरासरी उत्पन्न ५ क्विंटल ३४ किलो २ ग्रॅम इतके आले आहे. उडीदाच्या १५० पीक कापणी प्रयोगापैकी प्राप्त १२४ प्रयोगानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता ६ क्विंटल ४ किलो ३० ग्रॅम इतकी आली आहे.

बीड जिल्ह्यात खरीप ज्वारीची उत्पादकता येणे बाकी आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बाजरी पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी हेक्टरी उत्पादकता १५ क्विंटल ५८ किलो ६५७ ग्रॅम इतकी आली आहे. मुगाच्या पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादकता ८ क्विंटल ७७ किलो ५८० ग्रॅम इतकी आली आहे. उडीदाच्या प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार हेक्टरी उत्पादकता ९ क्विंटल ९१ किलो ९३९ ग्रॅम इतकी आली, असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

सोयाबीनची उत्पादकता अशी...

छत्रपती संभाजीनगर ः जिल्ह्यात ९५ टक्के सोयाबीन काढणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार सोयाबीनची जिल्ह्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ९ क्विंटल ९९ किलो २५३ ग्रॅम इतकी आली आहे.

जालना ः जिल्ह्यात सोयाबीनच्या ३१२ प्रयोगापैकी १९३ पीक कापणी प्रयोगानुसार सोयाबीनची सरासरी उत्पादकता १३ क्विंटल ३२ किलो ६२ ग्राम इतकी आली आहे.

बीड ः सोयाबीनची प्राप्त पीक कापणी प्रयोगानुसार हेक्‍टरी उत्पादकता २१ क्विंटल ८५ किलो १०० ग्रॅम इतकी आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Storage : कांदा साठवणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

Soybean Market : सोयाबीन बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच; शेतकरी मेटाकुटीला

International Flower Exhibition : आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभ

Sugarcane Agriculture Damage : उसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदचं, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकशाहीचा लोकोत्सव, ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान; अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT