Nagpur News: बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, धामणगावचे आमदार प्रताप अडसड आणि जळगावचे आमदार संजय कुटे यांच्याविरोधातील निवडणूक याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २२ ऑगस्टपासून अंतिम सुनावणी निश्चित केली आहे. या आमदारांविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी झाले होते आणि निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर झाले होते.
बुलडाणा मतदारसंघातून संजय गायकवाड यांनी जयश्री शेळके यांचा पराभव केला होता. तर, भाजपचे धामणगाव येथील प्रताप अडसड यांनी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप आणि जळगाव जामोद येथील संजय कुटे यांनी काँग्रेसच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांच पराभव केला. मात्र, याचिकाकर्त्यांनी हा पराभव मान्य केलेला नाही.
त्यांचा दावा आहे की निवडणुकीत विविध प्रकारच्या अनियमितता घडल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत लोकप्रतिनिधित्व कायद्यात नमूद केलेल्या प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे फॉर्म १७ (सी) आणि सीसीटीव्ही फुटेजसह इतर सर्व व्हिडिओ फुटेजच्या प्रति मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता.
यामध्ये मतदानासाठी ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट प्रिंटर गोदामातून बाहेर काढण्यापासून ते मतदानानंतर गोदामात आणण्यापर्यंतची माहिती समाविष्ट होती. त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणावरील सुनावणीत याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वरील आदेश जारी केले. अडसड यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी, याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. आकाश मून यांनी बाजू मांडली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.