Ration card Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Card : परभणी जिल्ह्यात पन्नास हजारांवर शिधापत्रिकाधारक

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५० हजार १९६ केशरी शिधापत्रिकाधारका अंतर्गत २ लाख २० हजार १९ लाभार्थी आहेत.

Team Agrowon

Parbhani News : राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी (Food Grain) थेट रोख रक्कम देण्यासाठी योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५० हजार १९६ केशरी शिधापत्रिकाधारका अंतर्गत २ लाख २० हजार १९ लाभार्थी आहेत. या अंतर्गत प्रति महिना प्रति लाभार्थी १५० रुपये एवढी रोख रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीव्दारे महिला कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, अमरावराती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे (प्रतिमहिना प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य, त्यात गहू प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये या दराने) अन्नधान्यांचा लाभ देण्यात येतो.

या योजनेकरिता आवश्यक अन्नधान्यांची खरेदी केंद्र शासनाकडून ‘नॉन एनएफएसए’ योजनेअंतर्गत गहू प्रतिकिलो २२ रुपये आणि तांदूळ प्रतिकिलो २३ रुपये दराने करण्यात येत होती.

परंतु या योजनेअंतर्गत यापुढे गहू आणि तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे.

निश्चित निकषानुसार शेतकरी योजनेतील लाभासाठी ‘रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम’(आरसीएमएस) वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडून डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशिल ऑफलाइन तसेच ऑनलाइन अर्ज नमुन्यात भरुन घेतला जाईल.

संबंधित तहसीलदार छाननी करून पात्र लाभार्थींची रास्त धान्य दुकाननिहाय यादी तयार करतील. या अंतर्गत रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी (आरसीएमए) संलग्न असणे आवश्यक आहे. पात्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जानेवारी २०२३ पासून लाभ देय राहील.

परभणी जिल्हा केशरी शिधापत्रिकाधारक स्थिती

तालुका - रेशन कार्ड संख्या - लाभार्थी संख्या

परभणी ८५०९ ३९८६३

जिंतूर ८५२४ ३६१६७

सेलू ५२९३ २३१७२

मानवत ३३९० १५६८०

पाथरी ४४७७ २०३३०

सोनपेठ ३२५५ १२९३५

गंगाखेड ५४४१ २२४३८

पालम ३७८९ १४५९०

पूर्णा ७५१८ ३३७४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT