Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीनला फटका

Crop Harvesting : उडीद, मुगाची काढणी झालेली असून सध्या सोयाबीनचे पिकाची काढणी सुरू आहे तर कपाशीचे देखील बोंडे फुटत आहेत.

Team Agrowon

Beed News : तालुक्यामध्ये खरिप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन काढणीस आले आहे तर कपाशी देखिल फुटण्यास सुरवात झाली आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात लावलेल्या पावसाने हजेरीमुळे सुमारे ५८ हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीनचे पिकाला फटका बसला असून याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

तालुक्यामध्ये जून महिन्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, बाजरी आदी खरिप पिकांची ६० हजार ३३२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. उडीद, मुगाची काढणी झालेली असून सध्या सोयाबीनचे पिकाची काढणी सुरू आहे तर कपाशीचे देखील बोंडे फुटत आहेत.

अशा परिस्थितीत परतीचा पाऊस बरसत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात जात आहे तर कपाशीचे फुटलेले पांढरे सोने काळवंडत असल्याची परिस्थितीत सध्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. काढून ठेवलेले सोयाबीनही या पावसामुळे खराब झालेले आहे. परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे. दरम्यान आता पुन्हा १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नुकसानीबाबत विमा कंपनीस कळवा

मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस बरसत आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे तक्रार करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील आठ दिवसांपासून सोयाबीन काढणी सुरू केलेली आहे. मजुरांची असलेली वानवा यामुळे सोयाबीन काढणीस विलंब होत आहे तर त्यात पाऊस बरसत असल्याने काढून ठेवलेले सोयाबीन पाण्यात जात असून उभ्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत.
- राहुल खामकर, शेतकरी, घळाटवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT