Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : नगर जिल्ह्यात पंधरा हजार हेक्टरवर कापसाची लागवड

Cotton Sowing : आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाची चांगली सुरुवात झाली, मात्र आता काही दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कापूस लागवडीला सुरुवात झाली. मात्र पेरणीला फारसा वेग येईना असे चित्र आहे.

आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा साधारणपणे सात लाख हेक्टरवर पेरणी, लागवड होईल असा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक भागात चांगला पाऊस झाला. नद्या, नाल्यांना पाणी आले. त्यामुळे मशागती पूर्ण झालेल्या क्षेत्रात कापूस लागवडीला वेग आला. आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून सर्वाधिक शेवगाव आणि नेवासा तालुक्यांत कापसाची लागवड झाली आहे.

सध्याही कापसाची लागवड वेगात सुरू असल्याने या महिनाअखेर बहुतांश कापूस लागवड आवरणार असल्याचे सांगितले जात आहे. अन्य पिकांची मात्र पेरणी फारशी वेगात सुरू असल्याचे दिसत नाही. सोयाबीन, मूग, उडीद, तुरीची यंदा अधिक लागवड होईल असे कृषी विभाग सांगत आहे.

तालुकानिहाय पेरणी (कंसात सरासरी क्षेत्र)

नगर ५०० (३७,८७५)

पारनेर ११५६ (५०४०१)

श्रीगोंदा २४३ (२६३३८)

कर्जत १५२ (५२३९६)

जामखेड २०० (४८८७०)

शेवगाव १२३५ (५२६६८)

पाथर्डी ५९५६ (६००५५)

नेवासा ११५७ (४४८८६)

राहुरी १४६ (२७५५४)

संगमनेर १४६ (५०८५०)

अकोले ३०० (३६२०२)

कोपरगाव २४ (३९८०९)

श्रीरामपूर ५० (२३४९१

राहाता ३५९ (२८३६९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT