Sustainable Agriculture Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture Award : कॅन बायोसिसला ‘फिक्की’चा ‘सस्टेनेबल ॲग्रिकल्चर’ पुरस्कार

Can Biosys : फिक्की ही व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी व जुनी संस्था आहे.

Team Agrowon

Pune News : कॅन बायोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) च्या वतीने प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय ‘सस्टेनेबल ॲग्रिकल्चर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील फिक्की हाऊस येथे आयोजित तिसऱ्या शाश्वत कृषी शिखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फिक्की ही व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी व जुनी संस्था आहे. शाश्वत आणि किफायती शेतीला चालना देणारे संशोधन केल्याबद्दल कॅन बायोसिसची देश पातळीवर निवड करण्यात आली.

फिक्कीचे अध्यक्ष परवेश शर्मा, सल्लागार सिराज हुसैन, ‘एफएसएसएआय’चे माजी सचिव आशिष बहुगुणा यांच्‍या हस्ते बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तंत्रज्ञान प्रमुख डॉ. मेधा कुलकर्णी, विपणन आणि मानव संसाधन विभागाचे सह-उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार, विक्री सह-उपाध्यक्ष राहुल पारखी या वेळी उपस्थित होते.

कानिटकर म्हणाल्या,‘‘भारतातील सर्वोत्तम मायक्रोबियल उत्पादन करत असताना आम्ही नेहमीच संशोधन आणि शाश्वत शेतीला प्राधान्य दिले आहे. 'फिक्की'ने याची दखल घेत राष्ट्रीय सन्मान केला याचा आनंद आहे. केंद्रीय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाने या संशोधनासाठी सहकार्य केले.

भाताबरोबरच गहू, ऊस, कापूस आदी पिकांमध्ये हे संशोधन पोहोचवण्यासाठी आम्ही विविध राज्य सरकारे, कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत आहोत. केंद्र सरकारने नुकतेच कार्बन क्रेडिट संदर्भातील राष्ट्रीय धोरण आणले आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ कसा मिळवून देता येईल, यावर कंपनीने भर दिला आहे.’’

दिल्ली येथे दरवर्षी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो. यामागे हरियाना-पंजाबातील पराली (तांदळाचे काड) जाळणे हे मुख्य कारण असते. ही पराली जाळण्याऐवजी आहे त्या शेतातच मातीत पूर्णत: एकजीव करणारे तंत्रज्ञान कॅन बायोसिसने शोधले.

लुधियाना येथील पंजाब कृषी विश्वविद्यालय आणि हिस्सार येथील हरियाना कृषी विश्वविद्यालयाने दोन वर्षे चाचण्या घेऊन हे संशोधन प्रमाणित केले. त्यानंतर हरियाना-पंजाबातील दहा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी या संशोधनाचा यशस्वी वापर करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT