Nashik DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेला अधिकाऱ्यांच्या ठेवींचा आधार

Nashik Co-Operative Bank : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकाच दिवशी १४ लाख २६ हजारांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकाच दिवशी १४ लाख २६ हजारांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. जिल्हा बँकेचे पालकत्व स्वीकारलेले राज्याच्या सहकार मंत्रालयाचे सहसचिव, अप्पर निबंधक संतोष पाटील,बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, सीईओ अरविंद शिंदे व कळवणचे सहायक उपनिबंधक शहा यांनी प्रत्येकी एक लाख रुपये ठेवी दिल्या. सहकार विभागातील इतर अधिकाऱ्यांनी आपल्या वतीने ठेवी बँकेत जमा करून बँकेला उभारी दिली आहे.

जिल्हा बँकेचे पालकत्व स्वीकारलेले संतोष पाटील यांनी शुक्रवारी (ता. ७) जिल्हा बँकेस भेट दिली. विभागीय सहनिबंधक संभाजी निकम,जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, प्रशासक प्रतापसिंह चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, विभागीय उपनिबंधक(सहकारी संस्था) संतोष बिडवई, जिल्हा विशेष लेखा परीक्षक अविनाश पाटील, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे दोन हजार ३०० कोटी रुपये कर्जदारांकडे थकीत आहेत. त्यामुळे ही वसुली मोहीम राबविण्यात येत असून, बँकेला ६३५ कोटींचे शेअर कॅपीपिटल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली.

या वेळी अप्पर निबंधक संतोष पाटील यांना नाशिक जिल्हा बँकेचे पालकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी बँकेस भेट दिली. स्वतः ठेवी जमा करत अधिकाऱ्यांनी बँकेवरील विश्वास वाढवला.

तसेच थकीत कर्जदारांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा बँकेस गतवैभव प्राप्त करून देणार असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

...यांच्या जमा झाल्या ठेवी

स्वतः पाटील यांनी १ लाख, विभागीय निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांनी रक्कम ५० हजार, बँकेचे प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कळवण तालुका सहाय्यक उपनिबंधक शहा यांनी १ लाख बँकेत जमा केले आहे.

बँकेचे येवला विभागाचे विशेष वसुली अधिकारी महेंद्र शेलार यांनी ५ लाख, सर्व तालुका सहाय्यक उपनिबंधक यांनी देखील प्रत्येकी रक्कम रुपये २५००० प्रमाणे ३ लाख २५ हजार, सटाणा सहाय्यक उप निबंधक यांनी ५१ हजार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जाधव यांनी ५० हजार असे १४ लाख २६ हजार अशा ठेवू जमा झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT