Agriculture Intercropping  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Intercropping : पाऊस थांबताच खतमात्रा, आंतरमशागतीला वेग

Rain Update : मागील तीन-चार दिवस सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडला. आता पावसाचे प्रमाण कमी झाले. बऱ्याच ठिकाणी पावसाने उघाड घेतल्याने शेतीची कामे सुरु झाली.

Team Agrowon

Akola News : मागील तीन-चार दिवस सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस पडला. आता पावसाचे प्रमाण कमी झाले. बऱ्याच ठिकाणी पावसाने उघाड घेतल्याने शेतीची कामे सुरु झाली. प्रामुख्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांना खतमात्रा दिली जात आहे. काही भागात आंतरमशागत, तणनियंत्रणासाठी फवारणीचे काम जोमाने सुरू झालेले आहे.

यंदा असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पेरणी झाली. तेव्हापासून आतापर्यंत पेरण्यांचे काम होत आहे. पाऊस जसजसा झाला तशा पेरण्या होत गेल्या.

त्यामुळे पिकांची लागवड सुद्धा बरीच मागे-पुढे झाली. काही ठिकाणी पीक एक महिना कालावधीचे झालेले आहे. तर काहीही ठिकाणी नुकतीच उगवण होऊ लागली. कुठे पेरणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पेरण्या झालेल्या पिकांना रासायनिक खताची मात्रा शेतकरी देत आहेत. पिकात वाफसा मिळताच आंतरमशागत शेतकरी करीत आहेत. तणनियंत्रण, तसेच पिकाला भर म्हणून डवरणी केली जात आहे.

कीड नियंत्रणासाठी फवारणी

सोयाबीन पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही अळी पिकाची पाने खात आहे. काही ठिकाणी वाणी (पैसा) कीडही आहे. यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकरी घेत आहेत.

पिकात तणही वाढलेले असल्याने त्यासाठीसुद्धा फवारणीचे काम केले जात आहे. निंदण, फवारणी, डवरणीच्या कामांसाठी मजुरांची मागणी वाढलेली आहे. निंदणासाठी महिला मजूर मिळणे सध्या अवघड झालेले आहे. लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमवण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालये, तहसील कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे शेतीच्या मजुरीसाठी संख्या सध्या कमी झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT