Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply : सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट रेल्वेने खत वाहतूक

Kharif Season : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे याकरिता प्रशासनाने थेट रेल्वेने खत आणण्याचा निर्णय घेतला असून २३०० टन खत लवकरच झाराप रेल्वे स्थानकात उतरविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg Fertilizer News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे याकरिता प्रशासनाने थेट रेल्वेने खत आणण्याचा निर्णय घेतला असून २३०० टन खत लवकरच झाराप रेल्वे स्थानकात उतरविण्यात येणार आहे.

खरीप हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार टन खतांची गरज असते. यापूर्वी जिल्ह्याला आवश्यक असलेला खतपुरवठा रत्नागिरी किवा कोल्हापूर जिल्ह्यांतून ट्रकच्या माध्यमातून केला जात होता.

परंतु या वाहतुकीला काही मर्यादा येत असल्याने जिल्ह्यात खत वेळेत पुरवठा होत नव्हते. यासंदर्भात खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्दशनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने १० मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.

सिंधुदुर्गकरिता थेट रेल्वेने खत वाहतूक करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार झाराप येथे खत उतरविण्यास रेल्वे प्रशासनाची मान्यता मिळाली असून लवकरच २३०० टन खत उतरविण्यात येणार आहे. तेथून तालुका खरेदी-विक्री संघ आणि सोसायट्यांच्या माध्यमातून खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

९ कोटी खर्चून गोदामाची उभारणी करणार

भविष्यात जिल्ह्यासाठी रेल्वेनेच खत वाहतूक केली जाणार असल्यामुळे आणलेल्या खतांची साठवणूक सुरक्षितपणे व्हावी या हेतुने झाराप रेल्वे स्थानकानजीक ९ कोटी रुपये खर्चून गोदाम उभारण्यात येणार आहे. या गोदामात ३ हजार टन खत ठेवण्याची क्षमता असणार आहे.

खत खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून तालुका खरेदी-विक्री संघांना पाच कोटींपेक्षा अधिक कॅश क्रेडिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाच टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने ही रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतीपीक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी खत खरेदी करावे.
मनीष दळवी, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT