Fertilizer Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : खत तुडवड्याचा मुद्दा ऐरणीवर

Fertilizer Crisis : खासदार यांच्या सुचनेनुसार मागील पाच वर्षांतील खतांची मागणी, आवक टन, पुरवठा व विक्री याबाबत आढावा घेण्यात आला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : खासदार तथा केंद्रीय खत समिती सदस्य डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी (ता. १४) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यामध्ये खताच्या कमतरतेचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला गेला.

बैठकीत जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामात खतांची करण्यात आलेली मागणी, झालेला पुरवठा, विक्री व शिल्लक खत साठा वाबाबत सविस्तर माहिती दिली.

खासदार यांच्या सुचनेनुसार मागील पाच वर्षांतील खतांची मागणी, आवक टन, पुरवठा व विक्री याबाबत आढावा घेण्यात आला. कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यात खतांची उपलब्धता आहे. ज्या भागात खतांची कमतरता जाणवते त्या भागात लगेच खतपुरवठा केला जात असल्याचे संगितले.

बैठकीदरम्यान उपस्थित शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींचे खत परिस्थितीबाबत म्हणणे ऐकून घेण्यात आले. शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील काही भागांमध्ये १०-२६-२६, डीएपी व युरिया या खताची कमतरता असल्याचे सांगितले.

कृषी निविष्ठा विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश मुधा यांनी मागील दोन ते तीन वर्षांपासून डीएपी, १०-२६-२६ यासारख्या खतांचा मंजूर कोटा कमी होत असल्याचे सांगितले, तसेच खत कंपन्या लिंकिंग करत असल्यामुळे विक्रेत्यांना अडचणी येत असल्याचेही सांगितले.

कंपनी प्रतिनिधी यांनी युरिया, डीएपी व १०-२६-२६ यासारख्या खतांचा पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. ई-पॉस मशिनवरून खतांचा साठा वेळेत कमी करत नसल्यामुळे खतांचा पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वत्र खतांचा पुरवठा केला जाईल व खत कमी पडल्यास त्याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल याबाबत सूचना दिल्या.

ज्या कंपन्या लिंकिंग करत आहेत त्यांना लिकिंग न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. लोखंडे यांनी तालुकानिहाय खतांची मागणी पाहून खताचे वाटप करण्याबाबत निर्देश दिले. या प्रसंगी अनिल पटेल, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, प्रकाश शेठ, विनोद तांबे, भास्कर घयावट आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामासाठीही खतांचा बफर स्टॉक तयार करावा. जिल्ह्यासाठी खरीप व रबी हंगामातील वाढीव मागणीच्या अनुषंगाने खतांचा मंजूर कोटा वाढवण्यासाठी कृषी आयुक्तालयास पत्र द्यावे.
- डॉ. कल्याण काळे, खासदर, जालना-छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT