Fertilizer Selling Agrowon
ॲग्रो विशेष

Linkage of Fertilizers : नगर जिल्ह्यात युरियासोबत अन्य खतांचे लिंकिंग

Fertilizer Selling : खरीप हंगामात युरिया खताची अधिकची मागणी आहे. पण कृषी निविष्ठा विक्रेते युरियाबरोबर शेतकऱ्याला गरज असो अथवा नसो इतर एका 150 रुपयांपर्यंतच्या लिक्विड खताची खरेदी करायला लावत आहेत.

Team Agrowon

Ahmednagar News : खरीप पिकांसाठी चढ्या दराने होत असलेल्या खते विक्रीच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मागणी असलेल्या खतांसोबत नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील विक्रेते बळजबरीने अन्य खते खरेदी करायला लावत आहेत. गरज नसलेल्या खतांची खरेदी केली नाही, तर इतर खतेही दिली जात नाहीत. खत कंपन्या आम्हाला बळजबरीने खते देत असतील, तर आम्ही ती विकणारच असे विक्रेते सांगत आहेत. कृषी विभाग मात्र तक्रारीची वाट पाहत आहे. नगर जिल्ह्यातील शेतकरी मात्र या प्रकाराने त्रस्त झाले असून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत आहेत.

नगर जिल्ह्यात मागणी असलेल्या खतासोबत अन्य गरज नसलेली खते, कीटकनाशके, नॅनो युरिया विक्री करण्याचा प्रकार यंदा नवा नाही. मात्र गेल्या वर्षी खत लिंकिंग बंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या, खत कंपन्यांना कारवाईचे इशारेही दिले गेले, मात्र खत लिंकिंग थांबलेच नाही. खताचे लिंकिंग व मागणी असलेल्या युरियासह अन्य खतांची चढ्या दराने विक्री होत असताना कृषी विभागाची भरारी पथके व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तक्रारीची वाट पाहत आहेत.

‘‘खत कंपन्या मुख्य वितरकांमार्फत आम्हाला बळजबरीने इतर खते देतात. ठरावीक किलोमीटर नंतर वाहतूकही वसूल करतात. विरोध केला तर कोणतेच खत देत नाहीत. कंपन्या आणि मुख्य वितरकांची मनमानी सुरू असल्याचे एका खत, विक्रेत्याने ‘अॅग्रोवन’ला फोन करून ही माहिती दिली. अकोल्यात दोन दिवसांपूर्वी रविवारी (ता. २३) संगमनेरला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीतही खताच्या लिंकिंगबाबत संताप व्यक्त केला गेला.

पाठीशी कोण घालतंय...?

नगरसह राज्यातील अनेक भागांत खतासोबत लिंकिंग केली जात असल्याबाबत विधानसभेच्या अधिवेशनात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला. खताची चढ्यादराने विक्री केली जात असल्याबाबत तक्रार आल्यास कारवाई करण्याचा इशारा देत तक्रारीसाठी व्हॉटसअॅप नंबर दिला. खताचे लिंकिंग आणि चढ्यादराने विक्री खपवून घेतली जाणार नसल्याचे कृषी विभागाचे अधिकारी, मंत्री सांगत आहेत. मग कंपन्या खतासोबत बळजबरीने लिंकिंग करत असताना त्यावर कारवाई का होत नाही, कोण अशा कंपन्यांना पाठिशी घालत आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT