Kharif Sowing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing Season : खत विक्रेत्यांचा मनमानी कारभार; युरिया खरेदीवर अन्य खते, उत्पादनांची सक्ती

Rahuri Fertilizer Sellers : सध्या राज्याच्या अनेक भागात मॉन्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणी लायक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील विविध भागात यंदा मॉन्सूनने वेळेवर हजर लावली आहे. त्यामुळे येथे कपाशीसह इतर पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी वर्गाकडून बियाणांसह खते खरेदी केली जात आहे. मात्र राहुरी तालुक्यात खत विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. खत विक्रेत्यांकडून युरिया खरेदी करताना अन्य खते किंव उत्पादने विकत घेण्याचा दबाव वाढत आहे. कृषि विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच खत विक्रेत्यांकडून अशी सक्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. तर या मनमानी कारभाराला कोण चाप लावणार? अशी विचारणा शेतकरी वर्गातून होत आहे.

राहुरी तालुक्यातील बहुतांश गावामध्ये यंदा चांगला पाऊस सुरू झाला असून खरीप पेरणीला वेग आला आहे. शेतकरी वर्गाची बि-बियाणे, खते घेण्यासाठी कृषि सेवा केंद्रामध्ये झुंबड उडाली आहे. काही शेतकर्‍यांनी उपलब्ध असलेल्या सिंचनावर पावसाअदोगरच कपाशीची लागवड केली आहे. त्यामुळे कापसासह इतर पिकांना युरिया खताची गरज भासत आहे. यादरम्यान काही खत विक्रेत्यांकडून गैरफायदा घेतला जात असून विक्री होत नसलेली खते व इतर उत्पादने शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहेत. 

युरिया खरेदी करताना अन्य खते किंवा उत्पादने घेण्याची सक्तीच खत विक्रेत्यांकडून केली जात आहे. आधीच दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणी असतानाच आता खताचे दर सध्या गगणाला भिडले आहेत. त्यातच आता इतर उत्पादने व नॅनो युरिया खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत असून शेतकरी वर्गाला वेठीस धरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणी वालीच उरला नाही अशी गत तालुक्यात झाली आहे. तर शेतकर्‍यांची अडवणूक आणि लूट तात्काळ थांबावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषि आधिकाऱ्याची बघ्याची भूमिका 

तालुक्यात शेतकर्‍यांची लूटमार राजरोसपणे सुरु आहे. याची सर्व माहिती तालुका कृषि आधिकाऱ्यांना आहे. मात्र कृषि आधिकारी फक्त बघ्याची भूमीका घेत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT