Dr. Anil Bhikane Agrowon
ॲग्रो विशेष

VIPM Fellowship : विस्तार संचालक भिकाने यांना फेलोशिप

Dr. Anil Bhikane : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांना जम्मू येथे व्ही.आय.पी.एम. सोसायटीच्या वतीने फेलोशिप देत सन्मानित करण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांना जम्मू येथे व्ही.आय.पी.एम. सोसायटीच्या वतीने फेलोशिप देत सन्मानित करण्यात आले.

पशुवैद्यकीय प्रतिबंधात्मक औषधी सोसायटीच्या राष्ट्रीय परिसंवादाच्या निमित्ताने त्यांचा गौरव झाला. जम्मू येथील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन शेर-ए- काश्‍मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. एन. त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भारतीय पशु वैद्यकीय संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एम. सी. शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश काटोच, व्हीआयपीएम संस्थेचे सचिव डॉ. अशोक कुमार, संघटन सचिव डॉ. नीलेश शर्मा यांची उपस्थिती होती.

डॉ. भिकाने यांनी माफसू अंतर्गंत उदगीर, लातूर, अकोला व नागपूर येथे विविध पदावर ३४ वर्षे सेवा दिली आहे. माफसूला लोकाभिमूख करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गरजू पशुपालक, शेतकऱ्यांना अहोरात्र सेवा ते देतात.

प्रयोगशाळेच्या चार भिंतीआड न अडकता प्रत्यक्ष गोठ्यावर जात सेवा देणे त्यासोबतच उत्साही व युवा पशुपालकांना मार्गदर्शनातही त्यांनी सातत्या राखले आहे. लंपी नियंत्रणात टास्क फोर्सचे सदस्य म्हणून त्यांनी मोचे योगदान दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT