Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Production : आंबा पिकाला पोषक हवामान फळांचे उत्‍पादन वाढण्याची शक्‍यता; बागायतदारांना दिलासा

Mango Crop : पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या थंडीसह दमट हवामानामुळे आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

Team Agrowon

PEN nEWS : पेण : पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या थंडीसह दमट हवामानामुळे आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्‍यामुळे यावर्षी आंब्यांच्‍या झाडांना योग्य प्रकारे मोहोर आल्याने मोठ्या प्रमाणात फळांचे उत्‍पादन होईल, असे वर्तविण्यात येत आहे. त्‍यामुळे बागायतदार शेतकरी समाधान व्‍यक्‍त करत आहेत.  

तालुक्यात २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्‍यानंतर डिसेंबर आणि नववर्षाच्या सुरुवातीला थंडीदेखील चांगली पडली आहे. त्‍यामुळे दमट, तसेच थंड हवामानामुळे आंब्याच्‍या पिकाला चांगल्या प्रकारे मोहोर आलेला दिसून येत आहे. तर आंब्यावर भुरी, तुडतुडे, तसेच मावा या रोगाची कीड लागून पिकावर आलेला मोहोर खाली पडून पीक नष्ट होण्याची शक्‍यात
असते. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम योग्य औषधांद्वारे पिकाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

तालुक्‍यात आंबा लागवडीसाठी जवळपास ७९५ हेक्टरच्या वर क्षेत्र आहे. त्‍यातच यंदा थंडीसह दमट हवामान आंबा पिकासाठी उत्तम असल्याने पीक सर्वाधिक येण्याची शक्‍यात वर्तविण्यात येत आहे.

पेणमध्ये थंडीचा जोर असून, या हंगामात सगळीकडे आंब्याच्‍या झाडाला चांगला मोहोर आला आहे. त्‍यामुळे यावर्षी आंबा पीक चांगले होईल, अशी आशा आहे. वेगवेगळी कीड लागण्याची भीती असल्याने फवारणी सुरू आहे.
-अमित पाटील, आंबा उत्पादक शेतकरी

तालुक्यात ६०० हेक्टरच्या वर आंबा लागवड करण्यात आली आहे. यावेळी आंब्याला मोहोर मोठ्या प्रमाणात आला आहे. मात्र रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यास कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी योग्य ती फवारणी करावी.
-सागर वाडकर, कृषी अधिकारी, पेण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT