Agriculture Seminar Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

Agriculture Seminar : मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी व ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे मार्गदर्शन, चर्चासत्र घेण्यात आले.

Team Agrowon

Buldhana News : मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी व ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे मार्गदर्शन, चर्चासत्र घेण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी व्यवस्थापन अभ्यासक अण्णासाहेब पुरुषोत्तम नीनू पाटील होते.

या वेळी मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना तळोले, केव्हीकेचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण देशपांडे, कृषी विद्याशास्त्रज्ञ डॉ. भारती तिजारे, मलकापूर तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी, बाजार समिती उपसभापती नागोजी राणे, मंडल अधिकारी आर. पी. पवार, प्रगतिशील शेतकरी दामोधर शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना ज्योत्स्ना तळोले म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे. आजचा काळ आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. बियाणे योग्य प्रतीचे वापरावेत. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत तळोले यांनी केले. अण्णासाहेब पाटील म्हणाले, की पाणी व्यवस्थापन आज काळाची गरज बनली आहे. आपल्या घराच्या गच्चीवर पाणी असो की शेतातील पाणी असो हे एका ठिकाणी गोळा केले तर पुढचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि मानवांसाठी सुखदायी जाऊ शकतो.

डॉ. देशपांडे म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेतीची नांगरटी योग्य पद्धतीने करावी. तणनाशक मारल्यानंतर सात दिवस कोणती फवारणी करू नये, असे सांगून त्यांनी कपाशीवरील लाल्या रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. तिजारे यांनी चांगल्या बियाण्याचे महत्त्व मांडले. श्री. सूर्यवंशी म्हणाले, की आज निसर्गाचा ऱ्हास होत आहे.

जेवढी झाडे कमी होतील तेवढे पाण्याचे संगोपन केले जाणार नाही. केव्हाही पाऊस पडेल. तरी शेतांमध्ये झाडे लावणे महत्त्वाचे आहे. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सचिन अवसरमोल यांनी ॲग्रोवनविषयी माहिती दिली.

श्री. पवार यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. चर्चासत्राला मलकापूर परिसरातील दाताळा, कुंड ,मलकापूर, हरणखेड गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सकाळ’चे बातमीदार विलास खर्चे यांनी केले. तर आभार सकाळचे प्रतिनिधी अशोक रावणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नरेश तायडे, नीलेश तांदुळकर, राहुल पाटील, योगेश वाघळे, पी. टी. खर्चे, संजय भारंबे, विजय कळमकर यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT