Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : शेतकऱ्यांना लवकरच फळ पीकविमा योजनेचे परतावे मिळणार

Banana Crop Insurance : केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देऊन निधी वितरित केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेली पीक विमा नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे सी.ए. हितेश आगीवाल आणि अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२३-२४ मधील पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला होता.

अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी हे पीक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते. पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देय असून ती तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे निर्देश दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT