Orange Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Export Subsidy : संत्रा निर्यात अनुदानापासून शेतकरी राहणार वंचित

Orange Market : बांगलादेशाने आयात शुल्क वाढविल्याने राज्य सरकारने संत्रा उत्पादकांना निर्यातीवर पन्नास टक्के अनुदानाची घोषणा केली होती.

Team Agrowon

Amravati News : बांगलादेशाने आयात शुल्क वाढविल्याने राज्य सरकारने संत्रा उत्पादकांना निर्यातीवर पन्नास टक्के अनुदानाची घोषणा केली होती. त्यासाठी अमरावती जिल्ह्यातून ४९ कोटी ६३ लाख रुपये अनुदानाची मागणी सहकार विभागाकडून करण्यात आली आहे. अद्याप हे अनुदान प्राप्त झाले नसून, त्याचा प्रत्यक्ष लाभ निर्यातदार कंपन्यांनाच अधिक होणार आहे.

गेल्या हंगामात बांगलादेशने संत्र्याच्‍या आयात शुल्कात वाढ केल्यामुळे महाराष्ट्रातून होणारी संत्रानिर्यात प्रभावित झाली. ८८ रुपये प्रति किलो, असे आयात शुल्क बांगलादेशकडून आकारले गेले. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बांगलादेशने आयात शुल्‍कात भरमसाट वाढ केल्‍याने राज्‍य सरकारने संत्र्याच्‍या निर्यातीवर ५० टक्‍के अनुदानाची घोषणा केली होती.

त्यानुसार ४४ रुपये प्रती किलो अनुदान मिळणार आहे. जिल्हास्तरावर संबंधित जिल्हा उपनिबंधक प्रस्तावाची छाननी करतील. त्यानंतर पणन संचालक आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून प्रस्ताव अनुदान मंजुरीसाठी शासनाला सादर केला आहे. अमरावती जिल्ह्यातून ३१ निर्यातदार कंपनीकडून बांगलादेशात ११ हजार ३४७ टन संत्रा निर्यात झाला आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पन्नास टक्के अनुदानापोटी ४९ कोटी ७६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. या अनुदानासाठी ५०२ शेतकरी पात्र ठरविण्यात आले आहेत. अद्याप हे अनुदान संत्रा उत्पादक शेतकरी किंवा निर्यातदार कंपनीला मिळालेले नाही.

शेतकऱ्यांना कसे मिळणार अनुदान?

संत्राउत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापारी संत्रा विकत घेतात व तो नंतर पॅकिंग करून निर्यात करतात. प्रत्यक्ष शेतकरी निर्यात करीत नसल्याने त्यांना निर्यातीवरील अनुदान कसे दिले जाणार, हा प्रश्न कायम असून त्याबद्दल स्पष्टता नाही. सहकार विभागाकडून ५०२ शेतकरी संख्या दाखविण्यात आली असली तरी त्यांनी संत्रा निर्यातदारांना विकला आहे. निर्यात शुल्क निर्यातदारानेच भरले आहे.

राज्य सरकारने बांगलादेशालाच निर्यात शुल्कच भरले असते तर देशांतर्गत संत्र्याचे भाव पडले नसते. त्याचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला असता. शेतकरी स्वतः निर्यात करीत नाही, तो कंपनी करते. त्यामुळे अनुदानाचा लाभ निर्यातदारांनाच मिळणार आहे. शेवटी नुकसान शेतकऱ्यांचेच होणार आहे.
श्रीधर ठाकरे, संचालक, महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT