Maharashtra Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : दुष्काळी सवलतीची शेतकऱ्‍यांना प्रतीक्षा

Drought Compensation : शासनाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १७ महसुली मंडलांत दुष्काळ जाहीर केला होता.

Team Agrowon

Yavatmal News : शासनाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १७ महसुली मंडलांत दुष्काळ जाहीर केला होता. यात राळेगाव, दारव्हा, नेर, पुसद, बाभूळगाव, उमरखेड या तालुक्यांतील मंडलांचा समावेश आहे. या मंडलांत दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही त्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या लाभाची प्रतीक्षा आहे.

कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी बिकट स्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. शासनाने १० नोव्हेंबर रोजी राज्यातील १०२१ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. यात यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १७ मंडलांचा समावेश आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमिटरपेक्षा कमी असे निकष लावण्यात आले आहेत.

दुष्काळी यादीत समाविष्ट असल्याने जिल्ह्यातील १७ महसुली मंडलांतील गावांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता यांसह इतर सवलती लागू करण्यात येणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप ह्या सवलती लागू करण्यात आलेल्या नाहीत. या सवलती लागू होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सवलतींचा लाभ देण्याची मागणी

राळेगाव तालुक्यातील झाडगाव, दारव्हा तालुक्यातील दारव्हा, चिखली, बोरी खुर्द, मांगकिन्ही, नेरमधील शिरसगाव, मोझर, पुसदमधील ब्राम्हणगाव, वरुड, खडांळा, गहुळ खु., शेंबाळप्रिंप्री, बाभूळगाव तालुक्यातील वेणी, घारफळ, पहूर तर उमरखेड उमरखेड बिटरगाव (बु.) आदी महसुल मंडलांत स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे तत्काळ दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी येथील शेतकऱ्यांची णी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT