Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Agriculture Department : सध्या सर्वत्र खरीप हंगामाच्या तयारीला सर्वात झाली आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाई तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले.

Team Agrowon

Satara News : सध्या सर्वत्र खरीप हंगामाच्या तयारीला सर्वात झाली आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाई तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले.

बावधन (ता.वाई) येथे कृषी विभाग, आत्मा व आयजीएल ॲग्रीकॉन फर्टिलायझर्स यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी शांताराम गोळे, बीटीएम आत्माचे प्रदीप देवरे, सहाय्यक कृषी अधिकारी भाग्यश्री कदम, एटीएम आत्माचे योगेश जयकर, सुनील निकत, प्रतीक शिर्के, तेजस गुळुंबकर, वाई मंडलमधील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सयाजी पिसाळ, अतुल भोसले, श्रीराम पोतदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी श्री. शेंडे यांनी कृषी विभागाच्या सुरू असलेल्या बियाणे उगवण क्षमता, बीजप्रक्रिया, शंखी गोगलगाय नियंत्रण मोहीम तसेच फळबाग लागवड, महाडीबीटी पोर्टलवरील योजना यांसारख्या विविध अनुदानाच्या योजनांची माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन अनुदानाच्या योजनांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या वेळी नितीन शिंदे यांनी हळद उत्पादन लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. तंत्र अधिकारी तेजदीप ढगे यांनी यावेळी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापर याविषयी माहिती दिली व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

उपकृषी अधिकारी निखिल मोरे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT