Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : हरियाणा निवडणुकीच्या तोंडावर शिवराज सिंह चौहान यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट; विविध मुद्द्यांवर चर्चा

Haryana Elections 2024 : पिकांचे भाव, प्रधानमंत्री पीक विमा, भटक्या जनावरांमुळे होणारे नुकसान आणि कापणीच्या वेळी शासन निर्णय, अशा मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्रीय शिवराज सिंह चौहान यांच्यात चर्चा झाली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पिकांचे भाव, प्रधानमंत्री पीक विम्यासह विविध मुद्द्यावर शेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यात चर्चा झाली. मंगळवारी (ता. २४) नवी दिल्लीतील पुसा कॉम्प्लेक्समध्ये ही बैठक झाली. यावेळी हरियाणासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीतील शेतकरी, शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. या बैठकीमुळे केंद्र सरकार हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच कृषिमंत्र्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांना भेटणार असल्याची माहिती दिली होती. आज मंगळवारी, त्यांनी दिल्लीत ५० शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाशी पहिली चर्चा केली. बैठकीत शेतकरी आणि केंद्रीय मंत्री यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषत: पिकांचे भाव, प्रधानमंत्री पीक विमा योजना, भटक्या जनावरांमुळे होणारे नुकसान आणि कापणीच्या वेळी शासनाचे विविध निर्णय अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.

यावेळी शिवराज सिंह चौहान म्हणाले, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा असल्याचे याआधीच आपण बोललो आहे. शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजे आपल्यासाठी देवाची पूजा करण्यासारखे आहे. यामुळेच दर आठवड्याला त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे दर मंगळवारी शेतकरी किंवा शेतकरी संघटनांना भेटणार आहे. काही वेळा ऑफिसमध्ये बसून समस्या समजून घेता येत नाहीत. समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याशी थेट बोलणे, चर्चा करणे आणि त्या सोडवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

आज मी विविध शेतकरी संघटनांच्या सुमारे ५० शेतकरी नेत्यांना भेटलो. त्यांच्याकडून अनेक सूचना मिळाल्या. काही सूचना पिकांच्या किमतीबाबत, काही पीक विमा योजनेबाबत, काही सूचना भटक्या जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत आहेत. तसेच पीक कापणीला आल्यावर देखील कोणते निर्णय घ्यावेत, याबाबत शेतकरी नेत्यांनी सूचना केल्या. यावेळी सोबत असणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना करण्यात आल्याचेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी नेत्यांनी पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ, बासमतीची किमान निर्यात किंमत काढून टाकणे, कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यापर्यंत कमी केल्याबद्दल सरकारचे आभार मानल्याचेही शिवराज सिंह चौहान म्हणाले. अशा प्रकारे सरकार आणि शेतकरी संवाद अखंड चालूच राहिल अशी ग्वाही शिवराज सिंह चौहान दिली. तर शेतकऱ्यांशीही बोलून त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत राहू असे देखील आश्वासन शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT