farmer protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप ; अजित पवारांच्या ताफ्यासमोर फेकले कांदे अन् टोमॅटो

Farmer Protest : कांदा-टोमॅटोला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमधील शेतकरी संतप्त झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदा आणि टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला.

Swapnil Shinde

Nashik News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. वणी चौफुली मार्गे नांदुरी कळवणच्या दिशेने त्यांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. कांदा आणि टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते सकाळी ओझर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दिंडोरीकडे जात असताना ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी ताफ्यासमोर कांदे आणि टोमॅटो फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.

केंद्राने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याचे भाव पडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato Rate) उच्चांकी भाव मिळत होता. मात्र सद्यस्थितीत टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तसेच सरकरच्या शेतकरी विरोध धोरणाचा निषेध करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT