Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

Heavy Rain Crop Loss : शेतातून काढून ठेवलेला शेतीमाल जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाईबाबतचा अहवाल तयार केला.

Team Agrowon

Dhule News : कुवे, अर्थे, निमझरी (ता. शिरपूर) परिसरात मागील वर्षी मार्चमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. पंचनामे पूर्ण झाले. पण शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळाली नाही. तातडीने भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतातून काढून ठेवलेला शेतीमाल जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाईबाबतचा अहवाल तयार केला. परंतु अधिकाधिक भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

कुवे परिसरात वादळ व पाठोपाठ पावसाने अर्धा तास धुमाकूळ घातला होता. अचानक आलेल्या अस्मानी आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडले. डोळ्यादेखत तयार झालेला शेतीमाल हवेत उधळला गेला. पाठोपाठ उभी पिकेही कोलमडून पडली.

कष्टाने फुलवलेला शेतीमाल वाहून जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मका, हरभरा, बाजरी, गहू, ज्वारी आदी पिकांसाठी कुवे परिसर प्रसिद्ध आहे. मक्याच्या पेरणीला तीन महिने पूर्ण झाले होते. गहू आणि हरभराही जोमात होते.

काही ठिकाणी कापणी करून पिके वाळवण्यासाठी बांधावर, खळ्यात ठेवली होती. उर्वरित पिके काढणीच्या अवस्थेत होती. वादळाने बांधावरील शेतीमाल उडवून नेला तर शेतातील उभी पिके जमीनदोस्त केली. काही शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे झाले. परंतु अनेकांची नुकसान भरपाई नुकसानीच्या टक्केवारीत अडकली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT