Maize Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Crop Failure: सदोष मका बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी

Defective Maize Seeds: बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्याला सदोष मका बियाण्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. योग्य निगा राखूनही पीक वाया गेल्याने दीड लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कठोर कारवाईसह नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Team Agrowon

Buldana News: पेरणी केलेले बियाणे सदोष निघाल्यामुळे कणीस भरण्यापूर्वीच मका सुकून गेल्याने शेतकऱ्यास पीक व उत्पन्न मिळू शकले नाही. त्यामुळे मका बियाणे उत्पादक कंपनी व विक्रेत्यांवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी, अशी तक्रार शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात केली आहे.

खैरा येथील शेतकरी अशोक श्रीराम मापारी यांचे खैरा शिवारात गट नं. ६६ व गट नं. ०४ मध्ये अनुक्रमे ०.४१ आर व ०.२५ आर बागायती शेती आहे. २०२४ - २५ च्या हंगामात सदर शेतकऱ्याने आपले शेत पेरणीयोग्य योग्य करून त्यात १५ नोव्हेंबर २०२४ रोजी नांदुरा येथून खासगी कंपनीच्या मका बियाण्याच्या प्रत्येकी ४ किलो वजनाच्या प्रति बॅग २ हजार रुपयांप्रमाणे खरेदी केल्या.

सहा हजार रुपये किमतीच्या तीन बॅग खरेदी करून त्याची लागवड शेतात केली होती. त्यानंतर सदर पिकाला वेळोवेळी खत, पाणी, फवारणी केली. जवळपास ४० हजार रुपये खर्च आला.

लागवडीनंतर शेतातील पिकाला आलेल्या कणसामधील मका पूर्णपणे भरण्यापूर्वीच सुकून गेला. हे पीक योग्य आले असते तर जवळपास या क्षेत्रातून दीड लाखाचे उत्पन्न मिळू शकले असते. दुसऱ्या शेतात वेगळ्या व्हरायटीचा मका पीक पेरले असता त्यात पुरेसे व योग्य उत्पन्न अपेक्षित आहे.

गावातील इतरही काही शेतकऱ्यांनी सदोष असलेले हे बियाणे पेरले असता त्यांची पण हिच स्थिती असल्याची माहिती आहे. या सदोष मका पिकाची पाहणी व पंचनामा करून सदर बियाणे कंपनी व विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदन तक्रारकर्त्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT