Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC Theft : पुणे बाजार समितीमधील चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त

Farmer Issue : पुणे बाजार समितीमधील शेतीमाल चोरीसह शेतकरी, वाहन चालकांच्या विविध चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील शेतीमाल चोरीसह शेतकरी, वाहन चालकांच्या विविध चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. रविवारी (ता.२८) पहाटे गेट क्रमांक चार येथील ड्रॅगनफ्रुटसह विविध शेतीमाल घेऊन आलेल्या टेम्पोतून मोबाईल चोरीला गेला.

ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची तक्रार देण्यासाठी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दोन तास ताटकळत राहावे लागले, अशी व्यथा तानाजी देवकाते आणि गणेश हेगडे यांनी सांगितली.

या घटनेचे गाऱ्हाणे हेगडे आणि देवकाते यांनी मांडले. हेगडे म्हणाले,‘‘मी रविवारी पहाटे ड्रॅगन फ्रूटसह विविध भाजीपाला घेऊन आलो. विविध गाळ्यांवर भाजीपाला उतरविल्यानंतर गेट क्रमांक ४ येथे टेम्पो लावला. पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान काही चोरट्यांनी चालक गाढ झोपेत असताना १६ हजार ५०० रूपयांचा मोबाईल चोरीस नेला.

तोंडाला रूमाल बांधलेले चोरटे चोरी करताना दिसत आहेत. अशीच घटना दोन महिन्यांपूर्वी गेट क्रमांक १ समोरिल पार्किंगमध्ये झाली. तसेच मोबाईलसह गाडीची स्टेपणी चोरीचे प्रकार घडले आहेत. या चोरीची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दोन तास ताटकळत रहावे लागले.’’

चोरी, गुन्हेगारीमुळे शेतकरी हैराण

‘‘सततच्या चोऱ्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. भुरट्या चोऱ्यांचे प्रकार जीवावर बेतण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. चोऱ्यांसह दमदाटी करून पार्किंग शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. सततच्या चोऱ्यांमुळे शेतकरी दहशतीखाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT