Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

Interrupted Power Supply : सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नारायणगाव,वारूळवाडी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Pune News : सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नारायणगाव,वारूळवाडी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले आहेत. आज सकाळपासून सात ते आठ वेळा वीज पुरवठा खंडित झाला. सतत खंडित होणाऱ्या वीस पुरवठ्यामुळे पाण्याअभावी नवीन इमारतीच्या बांधकामे, वेल्डिंग,बँकिंग, शेतीच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.

नारायणगाव परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर वीज पुरवठा खंडित झाला. आज सकाळी वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत सात ते आठ वेळा वीज खंडित झाला. पतसंस्था, बँकाचे आर्थिक व्यवहार ऑनलाइन होतात.

सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. पाण्याअभावी नवीन इमारतीचे बांधकामे व वेल्डिंगची कामे ठप्प झाली. विजेअभावी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकाच्या फवारणीचे नियोजन कोलमडले

येथील उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाला होता. गाव येथील लक्ष्मी थिएटर जवळ फिडर मध्ये दोष निर्माण झाला होता. दोष सापडण्यास उशीर झाल्याने फिडर बंद ठेवावे लागत होते. नारायणवाडी येथील डीपी नादरुस्त झाली होती. साहित्य उपलब्ध होतात डीपी चे काम पूर्ण करण्यात आले आहे.

आर. एन. बनकर, शेंडेकर ( अभियंता महावितरण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT