Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कळंबामध्ये भात, सोयाबीन वाचविण्यासाठी धडपड

Rain Crop Loss : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीसगावमध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून भात, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीसगावमध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून भात, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.

परिपक्व झालेले पीक शेत शिवारामध्ये भुईसपाट झाले आहे. त्यामुळे भाताच्या ओंब्या पूर्णपणे चिखलाने माखून गेल्या असून सोयाबीन कुजण्याची भीती आहे. त्यामुळे उत्पादनात दहा ते वीस टक्के घट होणार आहे.

कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी, पाचगाव, गिरगाव, चुये, कावणे, कोगील बुद्रुक, मोरेवाडी यासह चाळीसगावमध्ये साडेआठ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भात, सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली होती.

भाताच्या ओंब्या वाऱ्याने डौलू लागल्यामुळे शेतकरी कापणीसाठी प्रयत्न करू लागले होते. मात्र मॉन्सूनोत्तर पावसाने शिवारात भात पिके भुईसपाट झाली. भात पिकांच्या ओंब्यांना जागेवरच कोंब येण्याची शक्यता असून हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT